म्यानमारमधील लोकांची अवस्था बिकट, संयुक्त राष्ट्रांकडून मदतीचे आवाहन


वृत्तसंस्था

जीनिव्हा : म्यानमारमध्ये लष्करी राजवट आल्यापासून जनतेची अवस्था बिकट झाली असून सुमारे तीस लाख नागरिकांना विविध प्रकारच्या मदतीची आवश्यअकता आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार विभागाचे प्रमुख मार्टिन ग्रिफिथ्स यांनी सांगितले. तसेच, या नागरिकांना मदत करण्यासाठी जगभरातील मानवाधिकार संघटनांना परवानगी देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही ग्रिफिथ्स यांनी म्यानमारमधील सरकारला केले आहे. Sitiuation in Manymar get worsened

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच म्यानमारमध्ये निवडणूक होऊन लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यू की यांच्या पक्षाला प्रचंड यश मिळाले होते. मात्र, या निवडणूक निकाल प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत एक फेब्रुवारीला लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आणि स्यू की यांच्यासह अनेक नेत्यांना तुरुंगात डांबले.



देशभरात गेल्या दहा महिन्यांपासून संघर्ष आणि तणावाचे वातावरण आहे. यामुळे अनेक नागरिक मुलभूत सुविधांपासूनही वंचित आहेत. म्यानमारमधील तीस लाखांहून अधिक नागरिकांना तातडीने जीवनावश्यहक वस्तूंचा पुरवठा होणे आवश्यहक आहे, असा दावा ग्रिफिथ्स यांनी केला आहे. या नागरिकांना मदत करण्यासाठी ३८ कोटी ५० लाख डॉलरची गरज असून आतापर्यंत फक्त निम्माच निधी उभारला गेला आहे. त्यामुळे जगभरातील देणगीदारांनी आणि श्रीमंत देशांनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहनही ग्रिफिथ्स यांनी केला आहे.

Sitiuation in Manymar get worsened

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात