विद्यार्थ्यांचा होडी प्रवास थांबणार, निमसाखर-बांगर्डे पुलासाठी २५ कोटींचा निधी मंजूर; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

विशेष प्रतिनिधी

बारामती : इंदापूर आणि माळशिरस या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या निमसाखर-बांगर्डे पुलाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला अखेर यश आले आहे. नीरा नदीवर नवीन पूल उभारण्यासाठी केंद्रीय मार्ग निधीतून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला असून, येत्या तीन महिन्यांत प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे.

इंदापूर तालुक्यातील निमसाखर आणि माळशिरस तालुक्यातील बांगर्डे या दोन गावांदरम्यान नीरा नदी वाहते. निमसाखर हे परिसरातील महत्त्वाचे व्यापारी आणि शैक्षणिक केंद्र असल्याने बांगर्डेसह नदीपलीकडील गावांतील नागरिकांची बाजारपेठ, शिक्षण आणि दैनंदिन व्यवहारांसाठी निमसाखरला ये-जा असते. मात्र, नदीवर पूल नसल्याने विशेषतः पावसाळ्यात विद्यार्थ्यांना होडीतून धोकादायक प्रवास करावा लागत होता. अनेकदा जीव धोक्यात घालून करावा लागणारा हा प्रवास पालकांसाठीही चिंतेचा विषय ठरत होता. केवळ विद्यार्थ्यांचीच नव्हे, तर शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचीही पुलाअभावी गैरसोय होत होती. निमसाखर, दगडवाडी आणि निरवांगी परिसरातील नागरिकांना माळशिरस तालुक्यात जाण्यासाठी लांबचा वळसा घालावा लागत होता. त्यामुळे वेळ आणि प्रवास खर्च वाढत होता. या पार्श्वभूमीवर परिसरातील ग्रामस्थांकडून नीरा नदीवर पूल उभारण्याची मागणी सातत्याने केली जात होती. या मागणीची दखल घेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला. अखेर केंद्रीय मार्ग निधीतून या पुलासाठी २५ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे.

तीन महिन्यांत काम सुरू करण्याचे नियोजन…

निधी मंजुरीनंतर आता निविदा प्रक्रिया आणि आवश्यक प्रशासकीय बाबी पूर्ण करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. येत्या तीन महिन्यांत प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याचा मानस असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. हा पूल पूर्ण झाल्यानंतर इंदापूर आणि माळशिरस तालुक्यांतील गावांची कनेक्टिव्हिटी वाढणार असून, विद्यार्थ्यांचा होडीने होणारा धोकादायक प्रवास कायमचा थांबण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या पुलाच्या मंजुरीने दोन्ही तालुक्यांतील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Nimsakhar-Bangarde bridge—a success for the efforts of Agriculture Minister Dattatray Bharane.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात