अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलीनीकरणाला कायमचा ‘फुलस्टॉप’; सुप्रिया सुळेंकडून चर्चांना पूर्णविराम

Ajitdada

विशेष प्रतिनिधी

पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना मोठे उधाण आले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत या सर्व चर्चांवर पडदा टाकला आहे. माझा भाऊ अजित पवार होता तोपर्यंत विलीनीकरणाची चर्चा होती आणि तारीखही ठरली होती; पण ज्या दिवशी दादा गेला, त्या दिवशी माझ्या मनात आणि पक्षामध्ये या विलीनीकरणाला कायमचा ‘फुलस्टॉप’ लागला आहे, असा मोठा खुलासा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. यासोबतच मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, देशाच्या हितासाठी आणि सर्व राज्यांमध्ये समप्रमाणात 50 टक्के जागा वाढवल्या गेल्यास आम्ही त्यावर सकारात्मक विचार करू. Ajitdada

दादांच्या निधनानंतर विलीनीकरणाचा विषय कायमचा संपला

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी अत्यंत भावनिक आणि स्पष्ट भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, ज्या दिवशी माझ्या भावाचे आणि संघटनेतील मोठ्या पदाधिकाऱ्यांचे बोलणे झाले होते, तेव्हा माझा भाऊ होता तोपर्यंत विलीनीकरणाची चर्चा नक्कीच होती आणि अगदी तारीखही ठरली होती, हे दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी मान्य केले आहे. परंतु ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलीनीकरणाबद्दल माझ्या मनात, माझ्या अंतःकरणात आणि आमच्या पक्षामध्ये कायमचा पूर्णविराम लागला आहे. या विषयावर गेल्या अनेक महिन्यांत आमच्या पक्षाकडून किंवा कोणत्याही प्रवक्त्याकडून एकही अधिकृत विधान आलेले नाही. अजित पवार गटाकडून आलेल्या विधानांनाही आम्ही कधीही प्रत्युत्तर दिलेले नाही, असे सुळे यांनी स्पष्ट केले.



सर्व राज्यांत 50 टक्के जागा वाढल्यास डिलिमिटेशनवर विचार करू

मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांनी पक्षाची भूमिका मांडताना सांगितले की, सध्या लोकसभेचे मतदारसंघ 25 ते 30 लाख लोकसंख्येचे झाले आहेत. इतके मोठे मतदारसंघ हाताळणे कोणत्याही खासदारासाठी अवघड काम आहे. त्यामुळे जर मतदारसंघ पुनर्रचनेच्या वेळी सर्वच राज्यांमध्ये समान पद्धतीने 50 टक्के जागा वाढवल्या गेल्या, तर आम्ही त्याबद्दल सकारात्मक विचार करू. तसेच डिलिमिटेशनची प्रक्रिया राबवताना महिला आरक्षण हा मुद्दा प्राधान्याने लागू झालाच पाहिजे, अशी आमची ठाम मागणी आहे. संसदेने ते विधेयक आधीच एकमताने मंजूर केले आहे. यापूर्वीही जेव्हा 50 टक्के जागावाढीचा फॉर्म्युला समोर आला होता, तेव्हा आम्ही सर्व मित्रपक्षांशी चर्चा करून देशाच्या हितासाठी यावर नक्की विचार करू, अशीच भूमिका मांडली होती, असे सुळे यांनी नमूद केले.

पुन्हा तेच प्रश्न विचारून टीआरपी घालवू नका: सुप्रिया सुळे

पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना विनंती केली की, विलीनीकरणाच्या विषयावर मी परवा दिल्लीतही बोलले होते आणि आज पुन्हा तेच स्पष्ट करत आहे. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की यानंतर पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारू नका. मी पुन्हा तेच उत्तर दिले, तर तुम्ही तुमच्या चॅनेलचा आणि माझाही टीआरपी घालवाल. त्याऐवजी देशासमोर असलेल्या महागाईचे मोठे आव्हान, जागतिक इंधनाचे दर, अमेरिकेतील राजकीय बदलांचे भारतावर होणारे परिणाम आणि ‘वन नेशन, वन इलेक्शन’ यांसारख्या धोरणात्मक मुद्द्यांवर मला प्रश्न विचारून उत्तरदायी धरले तर मला मनापासून आनंद होईल, असे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

A permanent ‘full stop’ to the merger of the NCP following Ajitdada’s passing.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात