मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुलातील विविध सुविधांचे लोकार्पण

  • शासकीय इमारत, व्यायामशाळा व बॅडमिंटन हॉलमुळे जिल्ह्याच्या क्रीडा विकासाला चालना

गडचिरोली, दि. १५ नोव्हेंबर: गडचिरोली जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारत, व्यायामशाळा आणि बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नूतन बॅडमिंटन हॉलमध्ये स्वतः रॅकेट हाती घेऊन बॅडमिंटन खेळत हॉलचे उद्घाटन केले.

जिल्हा क्रीडा संकुलातील नवनिर्मित बॅडमिंटन हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्यक्ष कोर्टवर बॅडमिंटन खेळण्याचा आनंद घेतला. त्यांच्या या कृतीमुळे उद्घाटन सोहळ्याला वेगळे स्वरूप प्राप्त झाले. क्रीडा सुविधांच्या लोकार्पणासोबतच मुख्यमंत्र्यांचा प्रत्यक्ष खेळातील सहभाग हा कार्यक्रमातील लक्षवेधी क्षण ठरला.


गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिवसा’चा भव्य सोहळा; गडचिरोली 100 टक्के नक्षलमुक्त होऊन ‘स्टील सिटी’ म्हणून पुढे येत आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


क्रीडा विकासाला नवी चालना

जिल्हा क्रीडा संकुलातील नव्या सुविधांमुळे गडचिरोलीतील खेळाडूंना सराव, शारीरिक तंदुरुस्ती आणि क्रीडा कौशल्यविकासासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. प्रशासकीय इमारतीमुळे क्रीडाविषयक प्रशासकीय कामकाजाला सुविधा मिळणार असून व्यायामशाळेमुळे खेळाडूंना शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी मदत होणार आहे. तसेच नूतन बॅडमिंटन हॉलमुळे या खेळाच्या सरावासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध झाली आहे.

ग्रामीण व दुर्गम भागातील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अशा आधुनिक क्रीडा सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. जिल्ह्यातील युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी या सुविधांचा लाभ होणार असून गडचिरोलीच्या क्रीडा विकासाला नवी दिशा मिळण्यास मदत होईल.

मान्यवरांची उपस्थिती

या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय आदिवासी कार्य मंत्री जुएल ओराम, केंद्रीय राज्यमंत्री दुर्गादास उईके, राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वूईके, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, क्रीडा उपसंचालक महादेव कासगावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता अनिल गोटे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Inauguration of various facilities at the District Sports Complex by Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात