विशेष प्रतिनिधी
मुंबई : laxman Hake महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी उमेदवार निवडून आणायच्या पेक्षा पाडायची भाषा वापरली. त्याचा परिणाम प्रत्यक्ष निवडणुकीत दिसला. महायुतीला मोठा फटका बसला, पण आता हाच पाडायचा प्रयोग ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुढे न्यायचे ठरवत विधानसभा निवडणुकीत 50 उमेदवार पाडायची भाषा वापरली. यात त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांचा प्रामुख्याने समावेश केला. Manaoj Jarang After laxman kahe are also used other langauge
मनोज जरांगे तर विधानसभा निवडणुकीच्या रणमैदानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाडायच्याच इर्शेने उतरले आहेत. फडणवीस यांच्या विरोधात त्यांची दिवसेंदिवस भाषा आक्रमक होत चालली आहे. दसऱ्याच्या दिवशी नारायण गडावर मेळावा घेऊन मनोज जरांगे जाहीरपणे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. तिसऱ्या आघाडीने तर त्यांना परस्पर मुख्यमंत्री पदाचे उमेदवार देखील जाहीर करून टाकले आहे. laxman Hake
Dushyant Chautala : हरियाणा दुष्यंत चौटाला अन् खासदार चंद्रशेखर यांच्या ताफ्यावर दगडफेक
या पार्श्वभूमीवर ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी देखील आक्रमक भूमिका घेत 50 उमेदवार पाडायची भाषा वापरली आणि त्यामध्ये त्यांनी रोहित पवारांचा समावेश केला. त्याचबरोबर मनोज जरांगे यांना इंधन पुरवठा करणाऱ्या राजेश टोपे, आर. आर. आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांचाही या यादीत समावेश करून टाकला. laxman Hake
महाराष्ट्रात ओबीसी समाज 50 ते 60 % आहे. त्या समाजाने खरं म्हणजे महाराष्ट्राचे नेतृत्व केले पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त ओबीसी आमदार निवडून आणून शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अजित पवार या सगळ्या नेत्यांना ओबीसी समाजाची भीती बसली पाहिजे. कारण सगळे पक्ष ओबीसींना दुय्यम दर्जाची वागणूक देतात. ओबीसींनी त्यांची ताकद दाखवून उमेदवार पाडावेत म्हणजे सगळे नेते ओबीसींना घाबरतील, असे वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केले. laxman Hake
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App