अशोक खरात प्रकरण उघड करणारा पत्रकारच अटकेत; ‘१ लाख दे, नाहीतर नोकरी घालवेन’चा आरोप

विशेष प्रतिनिधी

अहिल्यानगर : अशोक खरात प्रकरण चर्चेत आणणारे पत्रकार दत्तात्रय पोपट खेमनार यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील फत्त्याबाद येथे महिला ग्रामविकास अधिकाऱ्याकडे कथितरित्या १ लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे. स्मशानभूमीच्या विकासकामावरून पैशांची मागणी, शासकीय कामात अडथळा, जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फत्त्याबाद ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी माधवी नामदेव पलघडमल (४५) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्या २०२२ पासून ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सध्या गावातील स्मशानभूमीत मुरूम टाकून जमीन सपाट करण्याचे शासकीय काम सुरू आहे.

१० ते १२ दिवसांपासून फोनवरून त्रास दिल्याचा आरोप

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, दत्तात्रय खेमनार हे गेल्या १० ते १२ दिवसांपासून महिला अधिकाऱ्याला वारंवार फोन करत होते. स्मशानभूमीच्या कामासाठी १ लाख रुपये देण्याची मागणी करून पैसे न दिल्यास काम करू देणार नाही, तसेच खोट्या प्रकरणात अडकवून नोकरी घालवण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या धमक्यांमुळे घाबरलेल्या महिला अधिकाऱ्याने १४ सप्टेंबर रोजी खेमनार यांना १,१०० रुपये ऑनलाइन पाठविल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, त्यानंतरही पैशांची मागणी सुरूच राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.


‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप

JCBचे काम थांबविल्याचा आरोप

दरम्यान, २४ सप्टेंबर रोजी सकाळी फत्त्याबाद येथील स्मशानभूमीत JCBच्या सहाय्याने मुरूम समतल करण्याचे काम सुरू असताना खेमनार तेथे कारमधून आले. त्यांनी कामगारांना शिवीगाळ करून काम थांबवण्यास सांगितल्याचा आरोप आहे. या घटनेचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

याशिवाय, स्मशानभूमीच्या कामासाठी मुरूम पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडूनही पैसे घेतल्याची माहिती तपासात समोर आल्याचे वृत्त आहे. मात्र, या बाबींची अंतिम पुष्टी तपास पूर्ण झाल्यानंतरच होणार आहे.

खंडणीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा

महिला ग्रामविकास अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून लोणी पोलिसांनी दत्तात्रय पोपट खेमनार यांच्याविरोधात खंडणी, शासकीय कामात अडथळा, मारहाण व जीवे मारण्याची धमकी तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

अशोक खरात प्रकरणामुळे आले होते चर्चेत

दत्तात्रय खेमनार हे यापूर्वी अशोक खरात प्रकरण समोर आणणारे पत्रकार म्हणून चर्चेत आले होते. आता त्यांच्यावरच खंडणी आणि ॲट्रॉसिटीसह विविध आरोपांखाली गुन्हा दाखल होऊन अटक झाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध झालेले नाहीत. पोलिस तपासातून या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती आणि संबंधित आरोपांची सत्यता स्पष्ट होणार आहे.

Journalist Dattatray Khemnar, who exposed Ashok Kharat case, arrested in mining case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात