गणपती विसर्जनानंतर जुहू बीचवर स्वच्छतेचा ‘श्रीगणेशा’; अजय देवगण, अमृता फडणवीसांसह मान्यवरांचा सहभाग

Ajay Devgn and Amruta Fadnavis.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : गणपती विसर्जनानंतर जुहू समुद्रकिनाऱ्यावर साचलेला कचरा आणि निर्माल्य हटविण्यासाठी शनिवारी (२६ सप्टेंबर) ‘सी शोर शाईन २०२६’ या विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. दिव्याज फाउंडेशनच्या पुढाकाराने, मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांच्या सहकार्याने झालेल्या या मोहिमेत अभिनेता अजय देवगण, अमृता फडणवीस आणि मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह स्वयंसेवक, विद्यार्थी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले. Ajay Devgn and Amruta Fadnavis.

अनंत चतुर्दशीनिमित्त झालेल्या गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ही मोहीम राबविण्यात आली. जुहू बीचवरील प्लास्टिक, निर्माल्य आणि अन्य घनकचरा हटविण्यासोबतच समुद्रकिनारा आणि सागरी पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष समुद्रकिनाऱ्यावर उतरून स्वच्छता केली.

अजय देवगणही स्वच्छता मोहिमेत सहभागी

अभिनेता अजय देवगण यांनी स्वयंसेवकांसोबत जुहू बीचवरील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून नागरिकांचाही त्यात सहभाग आवश्यक असल्याचा संदेश त्यांनी दिला. गणेशोत्सवासारखे सण साजरे करताना पर्यावरणाची काळजी घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमृता फडणवीस यांचा नागरिकांना संदेश

दिव्याज फाउंडेशनच्या संस्थापक अमृता फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आयोजित करण्यात आली. गणपती विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. अशा उपक्रमांमध्ये विद्यार्थी आणि तरुणांचा सहभाग वाढल्यास पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप

३४ टन कचरा जमा

‘सी शोर शाईन २०२६’ मोहिमेदरम्यान जुहू बीचवर सुमारे ३४ टन कचरा गोळा करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. दिव्याज फाउंडेशन, मुंबई महापालिका, मुंबई पोलिस आणि मेघाश्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त सहभागातून ही मोहीम राबविण्यात आली.

समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी सामूहिक सहभागावर भर

या मोहिमेत महापालिका अधिकारी, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्लास्टिक आणि अन्य घनकचरा समुद्रात जाण्यापासून रोखणे, निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि समुद्रकिनारे स्वच्छ ठेवणे यासाठी नागरिकांचा सातत्यपूर्ण सहभाग आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावरील कचरा साफ करण्यापुरती ही मोहीम मर्यादित न ठेवता, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन ही दैनंदिन नागरिकांची जबाबदारी बनावी, यावरही आयोजकांनी भर दिला.

Cleanliness drive kicks off at Juhu Beach; joined by Ajay Devgn and Amruta Fadnavis.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात