Amit shah : माध्यमांनी चालवला 2029 चा बोलबाला; प्रत्यक्षात अमित शाहांनी दिला व्होट जिहादवर मात करायचा फॉर्म्युला!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : Amit shah केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विधानसभा निवडणूक पूर्वी सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले. आधी त्यांनी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र यांचा दौरा केला. आज ते मुंबईमध्ये आले. या सर्व दौऱ्यांमध्ये त्यांचा मुख्य अजेंडा भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणे हाच राहिला. आजच्या संवादात अमित शाह यांनी 2024 आणि 2029 मधल्या विधानसभा निवडणुकांवर भाष्य करत 2024 मध्ये महायुतीचे सरकार पुन्हा येईल आणि 2029 मध्ये कमळाचे सरकार येईल, असे भाकीत केले. त्यावरून मराठी माध्यमांनी महायुती तुटण्याची मखलाशी चालवली. Amit shah gives vote jihad formula

प्रत्यक्षात अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी 2029 चा विषय काढला होता. तो तेवढ्यापुरताच मर्यादित होता. परंतु या मर्यादित विषयावरच मराठीमध्ये मखलाशी करून महायुती तुटण्याचे भाष्य केले.

अमित शहा यांनी आजच्या कार्यकर्त्या संवादात प्रामुख्याने महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेला व्होट जिहाद कसा भेदायचा, याविषयी मार्गदर्शन केले. लोकसभा मतदारसंघांमध्ये 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप जिंकला, पण केवळ मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये काँग्रेस नेते लीड तोडले. या मुद्द्याला कसे तोंड द्यायचे किंबहुना तो मुद्दा कसा पूर्णपणे खोडून काढायचा यावर अमित शाह यांच्या भाषणात भर होता.

अमित शाह म्हणाले :

जे सरकार काम करत तेच निवडणूक जिंकते, देशात आपण सलग तिसरे सरकार बनवले. आता आपली निराशा झटकून टाका, कोणत्याही सर्व्हेचा विचार करू नका. महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार येईलच, पण 2029 साली एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता आणायची आहे.

महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. महाराष्ट्रात सत्ता आल्यास समान नागरी कायदा आणण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही.

गेल्या 60 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग तीन वेळा सरकार बनविण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केला. महाराष्ट्राची निवडणूक देशाची दशा आणि दिशा बदलणारी निवडणूक आहे आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महायुती जिंकणार. महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढवा, विजय महायुतीचाच होईल. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार हे निश्चित आहे. महाराष्ट्रात महायुतीला रोखण्याची ताकद कुठल्याही पक्षात नाही.


Prithviraj Chavan : ठाकरे + पवारांच्या मनसुब्यांना पृथ्वीराज बाबांचा सुरूंग; “मुख्यमंत्री काँग्रेसचाच” सांगून शिवसेना + राष्ट्रवादीचे दावे उद्ध्वस्त!!


भाजप राज्य करण्यासाठी सत्तेत नाही तर विचारधारेवर काम करण्यासाठी सत्तेवर आहे. राम मंदिर, 370 हटवणं हे काम करण्यासाठी भाजप सत्तेत आली. महाराष्ट्रात निवडणूक जिंकल्यानंतर समान नागरी कायदा लागू करू. महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. भाजपचं सरकार आल्यानंतर गेल्या 10 वर्षात दहशतवाद आणि नक्षलवाद गाडला गेला. मोदीजींच्या नेतृत्त्वामुळे जगात भारतीयांची मान अभिमानानं उंचावली.

प्रत्येक बुथवर 10 % मतदान वाढवा. सरकार आपले आहे त्यामुळे आपल्याविरुद्ध नाराजी असू शकते. नगरसेवक, आमदार आणि खासदारांच्या विरोधात असलेली नाराजी दूर करा. प्रत्येक बूथवर आपल्याला 10 कार्यकर्ते पाहिजेत. दसऱ्यापासून प्रचार संपेपर्यंत हे कार्यकर्ते त्यांच्या बुथच्या कक्षेत फिरत राहतील. आपली विचारसरणी असलेल्या मतदारांना मतदानासाठी उतरवा. प्रत्येक बूथवर किमान 20 लोकांना भाजपचे सदस्य करा. सदस्य करताना मतं मागू नका. सदस्य झाल्यावर त्याला आपसुकच मतदानाचे महत्त्व कळेल.

लोकसभेच्या निकालाचे विश्लेषण करताना अमित शाह म्हणाले की, राज्यातील 6 लोकसभा मतदारसंघ असे आहेत, जिथे 5 विधानसभांमध्ये आपल्याला बहुमत होते, पण फक्त एका ठिकाणी विरोधक एकगठ्ठा बहुमत घेऊन जिंकले. याचा अर्थ 6 विधानसभा आपण जिंकू, तर महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकच विधानसभा मतदारसंघात जिंकेल, हा महत्त्वाचा मुद्दा नीट लक्षात घ्या. महाराष्ट्र प्रदेश भाजप जी योजना आखेल, ती 100 % कार्यान्वित करा. मंडल आणि वॉर्ड स्तरावर योजना पोहोचवा. विजय आपलाच असेल.

लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत 90 % मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला 85 % मार्क मिळाले, तर नेहमी 20 % मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्याने 30 % मार्क मिळवले, तरी तो गावात पेढे वाटत सुटला आहे.

मी कार्यकर्त्यापासून राष्ट्रीय अध्यक्ष पदापर्यंत मजल मारली. म्हणून मी जेव्हा कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतो तेव्हा मला खूप आनंद होतो. काही निवडणूक या देशाच्या राजकारणाची दिशा ठरवतात. माझ्या अनुभवावरून सांगतोय. महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल. गेल्या वर्षांत कुठलाही राजकीय पक्ष सलग तीन वेळा जिंकलेला नाही, हे लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने कामाला लागावे.

Amit shah gives vote jihad formula

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात