विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सोमवारपासून सुरू होणारा तीन दिवसांचा देशव्यापी बँक संप स्थगित करण्यात आला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू) आणि इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) यांच्यात रविवारी रात्री झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे २८ सप्टेंबर रोजी बँक शाखांचे कामकाज सुरू राहण्याची अपेक्षा आहे. Bank strike
दोन्ही संघटनांची रविवारी रात्री साडेनऊ वाजता बैठक झाली. बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातील सर्व शनिवार सुट्टी देऊन पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करावा, ही संघटनांची प्रमुख मागणी आहे. सध्या बँका महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात.
‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप
या मागणीवर विचार करण्यासाठी आयबीए आणि यूएफबीयूची संयुक्त उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे. समिती विविध पर्याय तपासेल आणि ग्राहकांचे हित लक्षात घेऊन संबंधितांशी चर्चा करेल. मात्र, सर्व शनिवार बँकांना सुट्टी देण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही.
वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठीच्या कामगिरीशी निगडित प्रोत्साहन योजनेबाबत तसेच २०२४ मधील चर्चेत प्रलंबित राहिलेल्या इतर मुद्द्यांवरही दोन्ही बाजू चर्चा करणार आहेत. तोपर्यंत यूएफबीयूने २८ ते ३० सप्टेंबरदरम्यानचा प्रस्तावित संप आणि संबंधित आंदोलन स्थगित केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App