विशेष प्रतिनिधी
मुंबई : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर निवडणूक आयोगाच्या विरोधात शांततापूर्ण आंदोलन करण्याचा कॉक्रोच जनता पार्टीचा (सीजेपी) प्रस्ताव होता. मात्र, या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. शिवाजी पार्कच्या वापराबाबत असलेल्या न्यायालयीन निर्बंधांचा आधार घेत पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. CJP permission
सीजेपीचे नेतृत्व अभिजीत दिपके करीत असून, पक्षाच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांकडे रीतसर परवानगी माग ण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या कामकाजासंदर्भात आपली भूमिका मांडण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले होते.CJP permission
आंदोलनासाठी शिवाजी पार्कची निवड करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी अर्जाची तपासणी केल्यानंतर या ठिकाणी आंदोलनास परवानगी देता येणार नसल्याचे आयोजकांना कळवले. शिवाजी पार्क हे मुख्यतः क्रीडा मैदान म्हणून निश्चित करण्यात आले असून, या ठिकाणी सभा, राजकीय कार्यक्रम आणि आंदोलनांच्या आयोजनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी काही निर्बंध घातले आहेत.
‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप
याच न्यायालयीन आदेशांचा आधार घेत पोलिसांनी सीजेपीला शिवाजी पार्कवर आंदोलन करण्यास नकार दिला आहे. आंदोलनाचा उद्देश शांततापूर्ण असला तरी ठरवलेल्या ठिकाणाच्या वापराबाबत असलेल्या नियमांमुळे परवानगी देणे शक्य नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी आंदोलन पूर्णपणे रद्द करण्याचे निर्देश दिलेले नसून, दुसऱ्या अधिकृत आंदोलनस्थळाचा पर्याय आयोजकांसमोर ठेवला आहे. मुंबईतील आझाद मैदान किंवा आंदोलनांसाठी निश्चित करण्यात आलेल्या अन्य अधिकृत ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी नव्याने परवानगी अर्ज करण्याची सूचना पोलिसांनी केली आहे.
त्यामुळे आता सीजेपीकडून आंदोलनाचे ठिकाण बदलले जाणार का, तसेच २ ऑक्टोबरचे प्रस्तावित आंदोलन अन्य ठिकाणी घेण्यासाठी पुन्हा परवानगी मागितली जाणार का, याकडे लक्ष लागले आहे. अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील सीजेपी पुढील भूमिका काय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App