विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेजेपी-एएसपीकडून रोड शोचे आयोजन करण्यात आले होते.
विशेष प्रतिनिधी
जींद : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले खासदार चंद्रशेखर यांच्या ताफ्याच्या वाहनावर हल्ला झाला आहे. दुष्यंत चौटाला आणि खासदार चंद्रशेखर यांचा ताफा रात्री उशिरा जिंदमधील उचाना येथे जाणार होता. या घटनेवरून रात्री उशीरा काही काळ गदारोळ झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेजेपी-एएसपीकडून रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. अज्ञातांनी वाहनावर दगडफेक केल्याचा आरोप आहे. दुसरीकडे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. उचाना कलानमधून जेजेपी एएसपी उमेदवार दुष्यंत चौटाला यांच्या बाजूने हा रोड शो काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Mithun Chakraborty : दादासाहेब फाळके पुरस्काराच्या घोषणेवर मिथुन चक्रवर्ती भावूक
या घटनेनंतर दुष्यंत चौटाला पोलिसांना धमकावत असल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. दुष्यंत चौटाला यांनी रात्रीच एफआयआर नोंदवण्याचा अल्टिमेटम पोलिसांना दिला होता. यावेळी खासदार चंद्रशेखर यांनी पोलिसांना कायदा दाखवत, सुरक्षेत कुठे त्रुटी आहेत हे सांगितले. उचना कलान पोलीस ठाण्याचे एसएचओ म्हणाले की, पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
यावेळी खासदार चंद्रशेखर यांनी घटनेनंतर पोलिसांना प्रश्न विचारला आणि एसपींशी बोलू, असे सांगितले. ते म्हणाले की ते संसदेचे सदस्य आहेत आणि त्यांच्यासाठी काही प्रोटोकॉल आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा होता. कोणाचे नुकसान झाले तर जबाबदार कोण? ते म्हणाले की, तुम्ही दलित समाजातील व्यक्तीची चेष्टा करत आहात… दुर्लक्ष का झाले?
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more