लोकसभा जिंकल्यानंतर निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा का काढला नाही? नितेश राणेंचा ठाकरे बंधूंना सवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : निवडणूक आयोगाच्या विरोधात ४ ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार निवडून आले, त्यावेळी निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा का काढला नाही? असा सवाल राणे यांनी ठाकरे बंधूंना केला. Nitesh Rane

निवडणूक जिंकल्यानंतर निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत कोणतेही प्रश्न उपस्थित केले जात नाहीत; मात्र निवडणुकीत पराभव झाल्यानंतरच आयोगावर आरोप केले जातात, असा दावा नितेश राणे यांनी केला. उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.


‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप


जेव्हा जेव्हा हे लोक निवडणूक जिंकतात, तेव्हा निवडणूक आयोगाबद्दल काही बोलत नाहीत. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढण्याची हिंमत दाखवली का? कारण त्यावेळी त्यांचे स्वतःचे खासदार निवडून आले होते,’ असा सवाल राणे यांनी केला.

केरळमध्ये काँग्रेस विजयी झाली किंवा कर्नाटकात काँग्रेस सत्तेत आली, त्या वेळी विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केले होते का, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला.

निवडणूक आयोग ही देशातील महत्त्वाची घटनात्मक संस्था असल्याचे सांगत या संस्थेबाबत आरोप-प्रत्यारोप करताना देशाच्या लोकशाहीविषयी गैरसमज निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही राणे यांनी केले.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावरून त्यांनी संजय राऊत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ४ ऑक्टोबरला प्रस्तावित असलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राणे यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गट आणि भाजपमधील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा धार येण्याची शक्यता आहे.

Nitesh Rane asks Thackeray brothers

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात