शेतकऱ्याचा मुलगा कृषिमंत्री व्हावा म्हणून चप्पल सोडली; नवस पूर्ण होताच मंत्र्यांनी स्वतःच पायात घातली!

Agriculture Minister

विशेष प्रतिनिधी

बारामती : शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा कृषिमंत्री व्हावा, या इच्छेने पायात चप्पल न घालण्याचा नवस करणाऱ्या इंदापूरच्या कार्यकर्त्याची इच्छा अखेर पूर्ण झाली. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतल्यानंतर भरणे यांनी स्वतः महाराष्ट्राची लोकप्रिय कोल्हापुरी चप्पल भेट देत या कार्यकर्त्याला ती पायात घालायला दिली.

इंदापूर तालुक्यातील पडस्थळ येथील विश्वजीत विलास मारकड या युवकाने दत्तात्रय भरणे आमदार तसेच राज्याचे कृषिमंत्री व्हावेत, यासाठी नवस केला होता. नवस पूर्ण झाल्यानंतर रविवारी (ता. २७) त्याने कृषिमंत्री भरणे यांची भेट घेत आपल्या नवसाची माहिती त्यांना दिली. यावेळी भरणे यांनी विश्वजीतच्या भावनेचा आदर करत त्याला कोल्हापुरी चप्पल भेट दिली आणि स्वतः त्याच्या पायात ती घातली. नवस पूर्ण झाल्याचा आनंद विश्वजीतच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.यावेळी हा कार्यकर्ता भावुक झाला होता.

‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप

‘त्याची इच्छा पूर्ण झाली आहे, म्हणून मला देखील आज आनंद आहे,’ अशी भावना दत्तात्रय भरणे यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, विश्वजीत मारकड याने भरणे यांच्याकडे आणखी एक इच्छा व्यक्त केली होती. या इच्छेबाबत अद्याप सार्वजनिकपणे माहिती देण्यात आलेली नसली, तरी ती इच्छा पूर्ण झाल्याचे संकेत स्वतः भरणे यांनी दिले आहेत. दत्तात्रय भरणे हे इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावचे असून शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी राजकारणात केलेला प्रवास आणि सध्या राज्याच्या कृषिमंत्रीपदापर्यंत पोहोचलेले स्थान यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी असलेली भावनिक नाळ या प्रसंगातून पुन्हा अधोरेखित झाली.

Party worker’s vow fulfilled; Agriculture Minister personally puts on Kolhapuri chappals.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात