विशेष प्रतिनिधी
मुंबई : 2024 ची विधानसभा निवडणूक महायुती जिंके पण 2029 मध्ये एकट्या भाजपची सत्ता येईल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केल्याबरोबर महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची गाळण उडाल्याचे दिसले. शिवसेनेपासून काँग्रेसपर्यंत सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, पण विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवारांना मात्र 2029 ची अशी काही धास्ती बसली, की त्यांना सत्तेची वळचण सुटण्याची भीती वाटली. त्यातूनच त्यांनी “तसे” काही होणार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. Ajit pawar fear of 2029 from Amit Shah’s statement
2019 मध्ये एकटा भाजप सत्तेवर येईल, असे जरी अमित शाह म्हणत असले, तरी 1985 नंतर महाराष्ट्रात कुठल्याही एका पक्षाला स्वबळावर बहुमत मिळून सत्ता आलेली नाही. महाराष्ट्राची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती आता पूर्ण भिन्न झाली आहे. त्यामुळे 2029 मध्ये कुठल्याही एका पक्षाची येण्याची शक्यता नाही. अर्थात भाजपला सिंगल लार्जेस्ट पार्टी करण्याचा अमित शाहांना नक्की अधिकार आहे, असे अजित पवार म्हणाले.
Dushyant Chautala : हरियाणा दुष्यंत चौटाला अन् खासदार चंद्रशेखर यांच्या ताफ्यावर दगडफेक
2029 अजून लांब आहे, एवढ्या एकाच वाक्यात प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो विषय संपवून टाकला. 2034 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल, असे जयंत पाटलांनी सांगितल्यानंतर सगळे पत्रकार हसले. त्यावर तुम्ही जसे आता हसलात, तसंच 2029 बाबत म्हणता येईल, अशी टिप्पणी जयंत पाटलांनी केली. 2024 मधला पराभव समोर दिसतोय म्हणून अमित शाह 2029 च्या बाता मारतात, असे टीकास्त्र काँग्रेस नेत्यांनी सोडले, पण अजित पवारांनी मात्र भाजपची एकहाती सत्ता फेटाळून लावली. यातून सत्तेची वळचण सुटण्याचीच भीती अप्रत्यक्षपणे व्यक्त झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more