राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनी लष्कराला कारवाईच्या सूचना दिल्या
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इस्रायल ( Israel ) आणि हिजबुल्लाह यांच्यातील युद्ध धोकादायक टप्प्यावर पोहोचले आहे. लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाहच्या हत्येनंतर अनेक इस्लामिक देश दहशतीत आहेत, त्यात सर्वात वरचे नाव इराणचे आहे, जे पूर्णपणे हादरले आहे आणि त्यांनी आता युद्धाची घोषणा केली आहे.
हिजबुल्लाह प्रमुख हसन नसराल्लाह यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणने इस्रायलवर थेट हल्ला चढवला आहे. इराणच्या संरक्षण दलाने (आयडीएफ) दावा केला आहे की इराणने मंगळवारी तेल अवीव आणि जेरुसलेमसह अनेक शहरांना लक्ष्य करत 400 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. इस्रायलची आयर्न डोम यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून लोकांना बंकरमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे.
इस्रायल डिफेन्स फोर्स (IDF) ने सोशल मीडियावर दावा केला आहे की इराणने मुस्लिम, ख्रिश्चन आणि ज्यूंचे पवित्र स्थळ असलेल्या जेरुसलेमच्या जुन्या शहरावर एकामागून एक अनेक क्षेपणास्त्रे डागली आहेत. आयडीएफने याचा व्हिडिओही जारी केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more