विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ambadas danave महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री जाहीर करण्याच्या मागणीला काँग्रेस आणि शरद पवार जरी आज वाटाण्याच्या अक्षता लावत असले, तरी प्रत्यक्षात शिवसेनेमुळेच त्यांना अडीच वर्षे सत्तापदे मिळाली. याचीच परखड शब्दांत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांना आठवण करून दिली. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार, असे दानवे यांनी ठणकावून सांगितले. Ambadas danave told Pawar + Congress!!
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी वारंवार केली, पण काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ती मागणी पूर्ण केली नाही या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी दिलेल्या एका मुलाखतीत शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांना काही परखड बोल ऐकवले. Ambadas danave
शिवसेनेला भाजपच्या मंत्रिमंडळात काही मंत्रीपदे तर नक्की मिळाली असती, पण शिवसेनेने भाजप पासून दूर जाण्याची भूमिका घेतली म्हणूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना सत्तेतली काही पदे मिळू शकली. अन्यथा काँग्रेस चौथ्या क्रमांकावर होती. राष्ट्रवादीची आमदार संख्याही फार मोठी नव्हती, पण उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतली. त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले आणि म्हणूनच काँग्रेस राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना मंत्री होता आले, हे विसरून चालणार नाही, असे अंबादास दानवे यांनी सुनावले.
Dushyant Chautala : हरियाणा दुष्यंत चौटाला अन् खासदार चंद्रशेखर यांच्या ताफ्यावर दगडफेक
2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील असेही दानवे यांनी ठणकावून सांगितले.
शरद पवारांनी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस कडून कोणीही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नसेल असे जाहीर रित्या सांगितले होते पण नंतर छुप्या पद्धतीने त्यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या दोघांची प्यादी पुढे सरकवायला सुरुवात केली. मात्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पवारांची ही खेळी हाणून पाडली. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस महाराष्ट्रात पहिला नंबरचा पक्ष झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल आणि काँग्रेसचा नेता मुख्यमंत्री होईल असे पृथ्वीराज बाबांनी कालच ठणकावले होते. यातून त्यांनी ठाकरे आणि पवारांचे मनसुबे उद्ध्वस्त केले होते, पण अंबादास दानवे यांनी त्यावर कडी करत राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांना उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील .त्यांच्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेची पदे मिळाली होती हे विसरता कामा नये, असे सुनावले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more