उद्धव ठाकरे यांनी जर विधान परिषद निवडून लढवली तर संजय राऊत यांचा गट त्यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ठाकरेंनी निवडणूक लढवू नये म्हणून संजय राऊत गट सक्रिय आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे.
बाजारातील चढ-उतार आणि अपेक्षेपेक्षा कमी परतावा असूनही National Stock Exchange of India (NSE) मध्ये गुंतवणूकदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. ज्यातून भारतीय भांडवली बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांचा मजबूत सहभाग दिसून येतो.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अंबादास दानवे यांच्या विधान परिषदेच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यामुळे एक बाब स्पष्ट झाली, ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी संसदीय राजकारणातून माघार घेतली. त्यांना शरद पवारांसारखी संसदीय राजकारणाची क्रेझ आणि गरज राहिली नाही.
मुंबईजवळील मीरा रोड परिसरात घडलेल्या चाकूहल्ला प्रकरणाने आता अत्यंत गंभीर वळण घेतले आहे. सुरुवातीला साधा गुन्हा वाटणाऱ्या या घटनेचा तपास आता दहशतवादविरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आला आहे. आरोपीच्या घरातून काही संशयास्पद आणि कट्टर विचारसरणीशी संबंधित साहित्य सापडल्याने तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ गुन्हेगारी नव्हे, तर व्यापक सुरक्षेच्या दृष्टीने पाहिले जात आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विश्वात आज महाराष्ट्राने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण २०२६ जाहीर केले. यातून राज्यात दहा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि दीड लाख रोजगार संधीची निर्मिती होणार आहे.
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. एकूण नऊ जागांसाठी निवडणूक होत असताना उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह वाढत असतानाच, शिंदे गटाकडून मोठा राजकीय डाव टाकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी दहावा उमेदवार उभा करण्याचे संकेत दिल्याने या निवडणुकीत नवे समीकरण निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांवर सध्या निरर्थक वाद सुरू असल्याचा असल्याचा दावा केला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सध्या निरर्थक वाद सुरू आहे. या देशात छत्रपती शिवरायांचा अवमान कुणीच करू शकत नाही. शिवाजी कोण होता? हे पुस्तक 1979 साली लिहिण्यात आले. त्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांना भिडायचे हे शुद्ध असामाजिक व असंवदेनशील कृत्य आहे, असे ते म्हणालेत.
येत्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाच्या केंद्रीय संसदीय समितीने मंजुरी दिल्यानंतर, पाच मुख्य जागांसाठी आणि एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रज्ञा सातव आणि अहिल्यानगरमधील युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नावांचा समावेश असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप निकाल एका झटक्यात पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त एक जागा येणार आहे, पण त्या जागेवरच उमेदवार ठरवताना सुद्धा राष्ट्रवादीची दमछाक झाली आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गासाठी परभणी जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रक्रिया येणाऱ्या सात दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत त्यांनी भूसंपादन प्रक्रियेत होत असलेल्या विलंबाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ’36 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-2026′ मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेत मुंबई पोलिसांनी बाजी मारली.
सुनेत्रा पवारच गैरहजर; मग मोदी बागेतले स्नेहभोजन पवार कुटुंबांमधल्या मतभेदांच्या भेगा बुजवू शकेल का??, असे विचारायची वेळ शरद पवारांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमापूर्वी आली.
मुंबईतील रिक्षाचालकांसाठी 1 मे 2026 म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय आता लांबणीवर पडला असून, रिक्षाचालकांना तयारीसाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक पवित्रा घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि राज ठाकरे यांना या मुदतवाढीवरून उपरोधिकपणे डिवचले आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील प्रस्तावित जागेत त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारकाचे आज भूमिपूजन करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळ, चौंडी (अहिल्यानगर) येथील जतन आणि संवर्धन विकास आराखड्यासंदर्भात बैठक संपन्न झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल घडवण्यासाठी आणि रोजगाराभिमुख उमेदवारांचा वेळ वाचण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महा-चतुर AI चॅटबॉटचे लोकार्पण करण्यात आले.
आम आदमी पक्ष (AAP) सोडून भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पहिला व्हिडिओ जारी केला. राघव चड्ढा म्हणाले की, AAP मध्ये विषारी कामाचे वातावरण (टॉक्सिक वर्क एन्व्हायर्नमेंट) निर्माण झाले होते. काम करण्यापासून आणि बोलण्यापासून रोखले जात होते. हा पक्ष आता काही भ्रष्ट आणि तडजोड करणाऱ्या लोकांच्या हातात अडकून राहिला आहे. हे लोक वैयक्तिक फायद्यासाठी काम करतात.
नाशिक येथील TCS मल्टिनॅशनल कंपनीतील धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खान यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालयाने या प्रकरणातील आपला निकाल राखून ठेवला असून, तो 2 मे रोजी दिला जाईल असे म्हटले आहे. ज्या 8 आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, त्यांपैकी निदा खान एक आहे.
नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता माफीनामा सादर केला आहे. “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. ज्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो, त्यांचा अवमान करण्याचा विचार स्वप्नातही येऊ शकत नाही,” असे म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या विधानामुळे दुखावलेल्या भावनांबद्दल माफी मागितली आहे. यावर आता राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रेल्वे रुळावरून घसरला. CSMT ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्रमांक 22225) ही पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करत असताना सायंकाळी ७:३० वाजता डायमंड क्रॉसिंगवर चौथ्या डब्याची एक ट्रॉली घसरली. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी आलीच पाहिजे या सरकारच्या भूमिकेचा पुन्हा पुनरुच्चार केला. राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना जुजबी मराठी आलीच पाहिजे. या प्रकरणी त्यांच्या संघटनांनी सरकारकडे 3 महिने ते 1 वर्षांपर्यंतची मुदत मागितली आहे. या प्रकरणी उद्याच्या आरटीओंच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणालेत. सरनाईक यांच्या या भूमिकेमुळे रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याचा निर्णय तूर्त लांबणीवर पडण्याचे संकेत मिळत आहेत.
नाशिक टीसीएस कॉर्पोरेट जिहाद मधली मुख्य मास्टर माईंड निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर नाशिक कोर्टामध्ये आज सुनावणी झाली. मात्र या दरम्यान पोलिसांनी प्राथमिक तपासाबाबत कोर्टाला जी माहिती दिली, त्यातून मालेगावात धर्मांतराचे रॅकेट असल्याचे उघडकीस आले. निदा खान अजूनही फरार असून ती तिच्या वकिलामार्फत कोर्टासमोर आपली बाजू मांडली. कोर्टाने तिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेऊन पूर्ण केली. पण निकाल मात्र २ मे रोजी द्यायचे जाहीर केले.
नाशिक टीसीएस कॉर्पोरेट जिहाद मधली मुख्य मास्टर माईंड निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर नाशिक कोर्टामध्ये आज सुनावणी झाली. मात्र या दरम्यान पोलिसांनी प्राथमिक तपासाबाबत कोर्टाला जी माहिती दिली त्यातून मालेगावात धर्मांतराचे रॅकेट असल्याचे उघडकीस आले. निदा खान अजूनही फरार असून मी तुझ्या वकिलामार्फत कोर्टासमोर आपली बाजू मांडत आहे. कोर्टाने तिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेऊन पूर्ण केली. पण निकाल मात्र २ मे रोजी द्यायचे जाहीर केले.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात सुरुवातीपासून अखेरच्या टप्प्यापर्यंत ममता बॅनर्जींनी अक्षरशः एकाकी प्रचार केला.
नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता माफीनामा सादर केला आहे. “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. ज्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो, त्यांचा अवमान करण्याचा विचार स्वप्नातही येऊ शकत नाही,” असे म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या विधानामुळे दुखावलेल्या भावनांबद्दल माफी मागितली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App