राणे-राऊत वादात अचानक ट्विस्ट! सामोपचाराचा प्रस्ताव; १० सप्टेंबरला काय होणार?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजपचे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधातील मानहानीचे प्रकरण सामोपचाराने मिटवण्याची तयारी दर्शवली आहे. २०२३ मध्ये भांडुप येथील कोकण महोत्सवात राणे यांनी राऊत यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून हा खटला दाखल करण्यात आला होता. Rane-Raut feud

माझगाव दंडाधिकारी न्यायालयात गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. राणे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सतीश माने-शिंदे यांनी न्यायालयाला सांगितले की, नारायण राणे यांना हे प्रकरण आता सामोपचाराने मिटवायचे आहे. त्यावर राऊत यांच्या वतीने वकील सार्थक शेट्टी यांनी राणे यांच्याकडून अद्याप कोणताही लेखी प्रस्ताव आलेला नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, लेखी प्रस्ताव प्राप्त झाल्यास त्यावर विचार केला जाईल, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १० सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.



नेमकं प्रकरण काय?

१५ जानेवारी २०२३ रोजी भांडुप येथे आयोजित कोकण महोत्सवात बोलताना नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. राऊत यांना खासदार होण्यासाठी आपण मदत केल्याचा दावा राणे यांनी केला होता. तसेच, राऊत यांचे मतदार यादीत नाव नसल्याचेही त्यांनी म्हटले होते.

या वक्तव्यावर आक्षेप घेत संजय राऊत यांनी माझगाव दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करत नारायण राणे यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला.

दरम्यान, या प्रकरणात दंडाधिकारी न्यायालयाने बजावलेल्या समन्सला नारायण राणे यांनी मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. समन्स बजावताना योग्य कायदेशीर प्रक्रिया पाळली नसल्याचा दावा राणे यांच्या अर्जातून करण्यात आला होता.

राऊत यांच्या वतीने या अर्जाला विरोध करताना राणे यांनी जाणूनबुजून सार्वजनिकरित्या आपली बदनामी केल्याचा युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सत्र न्यायालयाने राणे यांना दिलासा देण्यास नकार देत त्यांचा अर्ज फेटाळला होता.

यानंतर आता राणे यांच्या वतीने हे प्रकरण सामोपचाराने मिटवण्याचा प्रस्ताव न्यायालयात मांडण्यात आला आहे. मात्र, त्यावर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राऊत यांच्या बाजूने लेखी प्रस्तावाची प्रतीक्षा केली जात आहे.

A sudden twist in the Rane-Raut feud! A proposal for reconciliation; what will happen on September 10?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात