त्र्यंबकेश्वरमध्ये VIP दर्शनाला ‘नो एंट्री’! पैसे घेऊन मागच्या दाराने दर्शन दिल्यास थेट कारवाई

विशेष प्रतिनिधी

नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, शनिवार आणि सोमवार या गर्दीच्या दिवशी VIP दर्शन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पैसे घेऊन मागच्या दाराने दर्शन देण्याचे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. असे प्रकार करताना ट्रस्टी किंवा अन्य कोणीही आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. यासाठी मंदिर परिसरात साध्या वेशातील पोलिसही तैनात केले जाणार असल्याची माहिती नाशिकचे नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. Girish Mahajan

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर गिरीश महाजन यांनी पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसह त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या गर्दीच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांवरही विशेष भर देण्यात येणार आहे. यासाठी १०० बेडचे रेडीमेड रुग्णालय तातडीने ताब्यात घेण्यात येणार असून, स्वामी समर्थ ट्रस्टच्या रुग्णालयाचीही मदत घेतली जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी हेलिकॉप्टर आणि पुरेशा रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले.

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे रुंदीकरण तसेच रिंगरोडची कामे वेगाने सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.



निविदांवरून विरोधकांना प्रत्युत्तर

नाशिकमधील विकासकामांच्या निविदा गुजरातमधील ठेकेदारांना दिल्या जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपांवर महाजन यांनी टीका केली. सर्व निविदा प्रक्रिया १०० टक्के पारदर्शक असल्याचा दावा त्यांनी केला. अनेक कामांच्या निविदा २० ते ४२ टक्के कमी दराने गेल्या आहेत. त्यामुळे बेछूट आरोप करण्याऐवजी विरोधकांनी निविदांची कागदपत्रे आणि पुरावे तपासावेत, असे आवाहन त्यांनी केले.

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ५०० कोटींची निविदा

नाशिक शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी द्वारका परिसरातील कामांना वेग देण्यात आला आहे. शहरातून जाणाऱ्या कालव्यावर ‘बॉक्स’ टाकून चार पदरी रस्ता तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे ५०० कोटी रुपयांची निविदा लवकरच काढण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

दरम्यान, अपघातांना कारणीभूत ठरणारी धोकादायक झाडे हटवावी लागल्यास, एका झाडाच्या बदल्यात १०० नवीन मोठी झाडे लावून त्यांची योग्य देखभाल करून ती जगवण्याची हमी घ्यावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

३० ऑक्टोबरपासून कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाला सुरुवात

येत्या ३० ऑक्टोबरपासून कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रपती यांना निमंत्रण देण्यासाठी आपण स्वतः दिल्लीला जाणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

Trimbakeshwar VIP darshan completely halted on Girish Mahajan’s orders

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात