विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी / खंडाळा: महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या हप्त्यात वाढ करण्यासंदर्भात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. विधानसभा निवडणुकीत दरमहा ₹1,500 वरून ₹2,100 करण्याचा दिलेला शब्द राज्य सरकार नक्की पाळणार असून, योग्य वेळी लाडक्या बहिणींना ₹2,100 दिले जातील, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले आहे. वाटद (खंडाळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात उपस्थित महिलांशी संवाद साधताना त्यांनी योजनेच्या भवितव्याबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट केली.
लाडकी बहीण योजना शंभर टक्के सुरू राहणार; कोणीही बंद करू शकत नाही
कार्यक्रमात शासनाच्या विविध योजनांची माहिती देताना उदय सामंत यांनी विरोधकांच्या टीकांनाही अप्रत्यक्षपणे उत्तर दिले. ते म्हणाले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना शंभर टक्के सुरू राहणार असून ही योजना कोणीही बंद करू शकत नाही. महिलांच्या आरोग्यासाठी त्यांच्याकडे स्वतःचे हक्काचे पैसे असायला हवेत, याच उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली असून राज्यातील महिलांना न्याय देण्याची राज्य सरकारची ठाम भूमिका असल्याचे सामंत यांनी नमूद केले.
मुंबईतील २५ हजार रहिवाशांचा घरांचा प्रश्न मार्गी लागणार! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; आता मिळणार मालकी हक्क
₹2,100 रुपयांची ‘योग्य वेळ’ कधी येणार, याकडे लक्ष
सध्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा ₹1,500 थेट जमा केले जातात. विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीने सत्तेत आल्यास ही रक्कम वाढवून ₹2,100 करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणुका होऊन दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला तरी अद्याप महिलांना वाढीव रक्कम मिळालेली नसल्याने या मुद्द्यावरून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा शब्द पाळण्याची ग्वाही दिली असली, तरी ₹2,100 देण्याची ही ‘योग्य वेळ’ नेमकी कधी येणार, याबाबत त्यांनी कोणतीही निश्चित तारीख किंवा कालमर्यादा स्पष्ट केलेली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App