‘मनुस्मृतीच्या मानसिकते’वर राहुल गांधींचा हल्लाबोल; महिलांना दडपणाऱ्या विचारांविरोधात लढ्याचं आवाहन

विशेष प्रतिनिधी

पुणे : महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता ‘मनुस्मृती’तून आली आहे. आज आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध लढण्यासाठी आहे असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.

राहुल गांधी यांचा छात्रों की गुंज हा देशातील चौथा कार्यक्रम पुणे येथे हजारो मुलींच्या साक्षीने मोठया उत्साहात झाला. राहुल गांधी यांचे दुपारी पुण्यात आगमन झाले त्यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, नसीम खान, यशोमती ठाकूर यांच्यासह नेते व पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर संध्याकाळी राहुल गांधी यांनी छात्रों की गुंज कार्यक्रमात मुलींशी संवाद साधला, त्यांचे प्रश्न, समस्या व व्यथा जाणून घेतल्या.

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित लोक मुली आणि स्त्रिया पिंजऱ्यातच बंदिस्त राहाव्यात या मानसिकतेचे आहेत. पण असा भारत आपल्याला नको आहे. आपल्याला अशी व्यवस्था हवी आहे जिथे प्रत्येकाशी आदराने वागले जाईल. महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता ‘मनुस्मृती’तून आली आहे आणि आज आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध आहे, असा घणाघाती हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.



राहुल गांधी यांनी यावेळी देशातील महिलांच्या स्थिती बदद्ल भाष्य करत त्यांचे हक्क कसे नाकारले जात आहेत ते सांगितले. ते म्हणाले की, हजारो वर्षापासून देशात महिलांना त्यांचे हक्क व अधिकार नाकारण्यात आले, मनुस्मृती महिलांना स्वतंत्र असू नये असे म्हणते पण महिलांना स्वातंत्र्य दिले पाहिजे, त्यातच मोठी ताकद आहे. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे. मुलीचे वडील, भाऊ, पती किंवा मुलगा यांच्याशी नाते असू शकते, पण त्या त्यांची मालमत्ता नाहीत, त्या स्वतःच्या आहेत असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, समाजात महिलांना प्रगती करण्यापासून रोखण्यासाठी हिंसाचाराचा वापर केला जातो. या हिंसाचाराचे तीन प्रकार आहेत: शारीरिक हिंसाचार- दरवर्षी ४.५ लाख स्त्री-भ्रूणहत्या केल्या जातात. ८०% महिलांना छळाचा सामना करावा लागतो.२९% महिला शारीरिक हिंसाचाराला बळी पडतात. ६% महिलांवर बलात्कार होतो. संधी नाकारणारा हिंसाचार – सुरक्षिततेच्या नावाखाली ५०% महिलांना शिक्षण किंवा रोजगाराच्या संधी नाकारल्या जातात.

आर्थिक हिंसाचार- सुरक्षित प्रवासाच्या नावाखाली दरवर्षी अतिरिक्त १७,५०० रुपयांचा खर्च करावा लागतो. देशात महिलांवर वेगवेगळ्या प्रकारे नियंत्रण ठेवले जाते. ६०% महिला एकट्या घराबाहेर जाऊ शकत नाहीत. निर्णय स्वातंत्र्य/निवड: ४५% महिलांना लग्न किंवा घरगुती जबाबदाऱ्यांमुळे शिक्षण किंवा काम सोडावे लागते. आर्थिक अधिकार: केवळ ८% महिलांकडे जमिनीची मालकी हक्क आहेत. आपल्या देशात अनादर किंवा अवमानाची विविध रूपे दिसून येतात: सामाजिक बदनामीच्या भीतीमुळे लैंगिक हिंसाचाराच्या ९९% घटनांची नोंदच केली जात नाही. ८४% महिलांना नोकरी करण्यासाठी आपल्या कुटुंबाची परवानगी घ्यावी लागते. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे उत्पन्न २५% कमी असते आणि त्यांना सहजपणे पदोन्नती मिळत नाही.

“जेव्हा मी पुरुषांशी बोलतो, तेव्हा मला असे आढळते की स्त्रियांना अनेकदा केवळ तीनच चौकटींत पाहिले जाते: मुलगी, पत्नी किंवा आई. यापैकी कोणत्याही भूमिकेत काहीही गैर नाही पण या तुमच्या एकमेव ओळखी असू शकत नाहीत. स्त्रिया या व्यावसायिक, खेळाडू, नेत्या, निर्मात्या, उद्योजिका अशा अनेक भूमिका निभावणाऱ्या असतात. तरीही, अनेकदा त्यांची ओळख केवळ एखाद्या पुरुषाशी असलेल्या नात्यावरूनच ठरवली जाते.” असे राहुल गांधी यांनी सांगितले.

‘Mindset of suppressing women stems from Manusmriti, our fight is against it’: Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात