पहिला, दुसरा आणि आता तिसरा टप्पा! राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा

farmers

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील लाभ वितरणाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात राज्यातील ३ लाख २७ हजार २५० पात्र शेतकऱ्यांना ३ हजार १६० कोटी ४३ लाख रुपयांचा कर्जमुक्ती लाभ दिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात ऑनलाइन पद्धतीने या लाभाचे वितरण करण्यात आले.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ६ लाख २२ हजार २०७ पात्र शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यात ६ लाख ३६ हजार ३६ शेतकऱ्यांना ५ हजार ८६ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. आता तिसऱ्या टप्प्यातील वितरण सुरू झाल्याने शेतकऱ्यांना आणखी दिलासा मिळणार आहे.



तीन टप्प्यांत १५.८५ लाख शेतकऱ्यांना लाभ

योजनेच्या तीनही टप्प्यांत आतापर्यंत राज्यातील एकूण १५ लाख ८५ हजार ४९३ शेतकऱ्यांना १३ हजार २७५ कोटी रुपयांचा कर्जमुक्ती लाभ वितरित करण्यात आला आहे. पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असून, लाभार्थ्यांची संख्या सातत्याने अद्ययावत केली जात आहे.

मुख्यमंत्री स्तरावरून देखरेख

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीवर मुख्यमंत्री स्तरावरून नियंत्रण आणि देखरेख ठेवण्यात येत आहे. पात्र शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्याची प्रक्रिया पुढे सुरू राहणार आहे.

First, second, and now the third phase! Relief from debt waivers for lakhs of farmers in the state.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात