बारामतीतील वाढत्या गुन्हेगारीवर सुप्रिया सुळेंची चिंता; मुख्यमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी

विशेष प्रतिनिधी

बारामती : माळेगाव येथील पेट्रोल पंपावर झालेला सशस्त्र हल्ला आणि सुपे परिसरातील बाबुर्डी व शेरेवाडी येथे महिलांच्या हत्येच्या घटनांची खासदार सुप्रिया सुळे यांनी दखल घेतली आहे. बारामती तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुळे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

बारामती तालुक्यात अलीकडच्या काळात मारहाण, दहशत निर्माण करणे, प्राणघातक हल्ले तसेच हत्यांसारख्या गंभीर घटना घडत असल्याकडे सुळे यांनी लक्ष वेधले. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, कायदा व सुव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माळेगाव परिसरातील पेट्रोल पंपावर टोळक्याने केलेल्या सशस्त्र हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेनंतर काही दिवसांतच सुपे जवळील बाबुर्डी आणि शेरेवाडी परिसरात दोन महिलांची हत्या झाल्याची घटना घडली.


‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप


विशेषतः शेरेवाडी येथे दोन्ही महिला झोपेत असताना त्यांच्यावर हल्ला करून हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एकापाठोपाठ घडलेल्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी पोलीस प्रशासनाने सर्व प्रकरणांचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. केवळ गुन्हे घडल्यानंतर कारवाई न करता, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करावी. तसेच वाढत्या गुन्हेगारीला वेळीच आळा घालण्यासाठी गृहमंत्र्यांनी पोलीस यंत्रणेला तातडीने आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Supriya Sule expresses concern over rising crime in Baramati; demands strict action from the Chief Minister.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात