प्रदीप पूर्णेकर प्रकरणी शिंदेंच्या माजी नगरसेविकेवर ‘एफआयआर’, वातावरण तणावपूर्ण

Pradeep Purnekar

विशेष प्रतिनिधी

ठाणे : ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्याच कार्यालयात घुसून पाच जणांनी हा हल्ला केला. या राजकीय हत्येमुळे ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.

मंगळवारी (ता.२९) रात्री मानपाडा येथील गणेशनगरमधील कार्यालयात प्रदीप पूर्णेकर उपस्थित असताना आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवला. गंभीर जखमी झालेल्या पूर्णेकर यांचा जागीच मृत्यू झाला. या हत्येमागे शिंदे सेनेच्या माजी नगरसेविका मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचाच मुख्य हात असल्याचा गंभीर आरोप प्रदीप पूर्णेकर यांचे भाऊ जयनाथ पूर्णेकर आणि मुलगा राम पूर्णेकर यांनी केला आहे. मारेकऱ्यांना आणि मुख्य सूत्रधाराला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा आक्रमक पवित्रा पूर्णेकर कुटुंबीयांनी घेतला होता.



या घटनेनंतर ठाकरे गट अत्यंत आक्रमक झाला आहे. बुधवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि राजन विचारे यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तिथेच ठिय्या मांडला.

मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नावे एफआयआरमध्ये समाविष्ट केल्याशिवाय पोलीस ठाण्यातून हलणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी दिला. तसेच, पोलिसांनी सहकार्य न केल्यास जमावाला सोबत घेऊन मिनाक्षी शिंदे यांच्या घराकडे मार्च काढण्याचा इशारा संजय राऊत यांनी दिल्यानंतर, पोलिसांनी पुरवणी जबाबात शिंदे दांपत्याची नावे समाविष्ट केली. त्यानंतर पूर्णेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणी मातोश्रीवरून थेट उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील विभागप्रमुखांची बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. ‘ठाण्यातील दडपशाही आता खपवून घेतली जाणार नाही. मुख्य सूत्रधाराला अटक होईपर्यंत मागे हटायचे नाही. आपण पूर्णेकर कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे आहे.’ असेह उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विभागप्रमुखांच्या बैठकीत सांगितले.

तपास आणि पोलिसांची कारवाई

ठाणे गुन्हे खंडणी विरोधी शाखेची ३ पथके आणि इतर ६ पथके अशा एकूण ९ पथकांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. मुंबईसह राज्यभरात विविध ठिकाणी पोलीस आरोपींच्या मागावर आहेत. पोलिसांनी आतापर्यंत ३ महिला आणि २ पुरोषांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण हत्येपूर्वी मुख्य आरोपी ‘पप्या शिंदे’ याच्या संपर्कात असल्याचे तपासात उघड झाले असून, त्यांच्या चौकशीतून महत्त्वाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

सध्या ठाण्यातील मानपाडा आणि कापूरबावडी परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे.

FIR registered against Shinde’s former corporator in the Pradeep Purnekar case; atmosphere tense.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात