मुंबै बँकेत ‘दरेकर पॅटर्न’ कायम! सर्व 15 जागा खिशात; अडसूळ गटाचा सुपडा साफ

Mumbai Bank

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबै बँक एम्प्लॉईज युनियनच्या मुंबई बँक युनिट निवडणुकीत भाजप समर्थित कै. दीपक चंदगडकर स्मृती पॅनलने एकतर्फी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेते आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला मोठा धक्का बसला. 15 पैकी एकही जागा अडसूळ यांच्या पॅनलला जिंकता आली नाही. Mumbai Bank

कै. दीपक चंदगडकर स्मृती पॅनलने निवडणुकीतील सर्वच्या सर्व 15 जागांवर विजय मिळवत मुंबै बँकेतील आपले वर्चस्व कायम ठेवले. आमदार प्रवीण दरेकर, शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, नंदकुमार काटकर आणि प्रसाद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.



अडसूळांच्या पॅनलला खातंही उघडता आलं नाही

मुंबै बँकेवरील वर्चस्वाच्या दृष्टीने यंदाची निवडणूक महत्त्वाची मानली जात होती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पॅनल मैदानात उतरवले होते. त्यामुळे दरेकर समर्थित पॅनलसमोर अडसूळ गटाचे आव्हान उभे राहिले होते.

मात्र, निकालात दरेकर समर्थित पॅनलने सर्व 15 जागा जिंकत एकतर्फी बाजी मारली. अडसूळ यांच्या पॅनलमधील एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे मुंबै बँकेच्या निवडणुकीत अडसूळ गटाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

दरेकर गटाचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित

आमदार प्रवीण दरेकर यांचे मुंबै बँकेवरील वर्चस्व यापूर्वीपासूनच राहिले आहे. 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत दरेकर यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनल’ने सर्व 21 जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळीही बँकेवरील सत्ता दरेकर गटाने कायम ठेवली होती.

यंदा जागांची संख्या 15 असली तरी दरेकर समर्थित कै. दीपक चंदगडकर स्मृती पॅनलने पुन्हा सर्वच्या सर्व जागा जिंकल्या. त्यामुळे मुंबै बँकेच्या कारभारातील दरेकर गटाची पकड कायम असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

भाजप विरुद्ध शिंदे गटाच्या पॅनलमध्ये सामना

या निवडणुकीकडे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) समर्थित पॅनलमधील सामना म्हणूनही पाहिले जात होते. आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निकालात दरेकर समर्थित पॅनलने पूर्ण वर्चस्व मिळवत प्रतिस्पर्धी पॅनलला एकही जागा मिळू दिली नाही.

या विजयामुळे मुंबै बँकेतील दरेकर गटाचे संघटनात्मक वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, अडसूळ गटासाठी हा निकाल मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

‘Darekar Pattern’ prevails at Mumbai Bank! All 15 seats secured; Adsul faction completely wiped out.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात