उद्धव-राज ठाकरे एकाच मंचावर येणार; आजच्या मोर्चासाठी पोलिसांच्या विनंतीनंतर मोठा बदल

Uddhav and Raj Thackeray

विशेष प्रतिनिधी

मुंबई : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकाराने आज, ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत जनमोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, या मोर्चाचा पूर्वनियोजित मार्ग बदलण्यात आला आहे. आता भायखळ्याऐवजी मेट्रो सिनेमा ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय असा मोर्चाचा नवा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. शिवसेना नेते अनिल परब आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. Uddhav and Raj Thackeray

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या जनमोर्चाची हाक दिली आहे. सुरुवातीला हा मोर्चा भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीपासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत काढण्याचे नियोजन होते. मात्र, मुंबई पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने मार्ग बदलण्याची विनंती केली. पोलिसांच्या विनंतीचा मान राखून मोर्चाचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतल्याचे अनिल परब यांनी सांगितले.



मोर्चाची वेळ कायम; सभेत रूपांतर होणार

नव्या नियोजनानुसार मोर्चाला सकाळी १० वाजता मेट्रो सिनेमापासून सुरुवात होईल आणि तो मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत जाईल. मार्गात बदल करण्यात आला असला तरी मोर्चाच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मोर्चानंतर त्याचे रूपांतर जाहीर सभेत होणार असल्याची माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली.

विविध पक्षांच्या नेत्यांना सहभागी होण्याचे आवाहन

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत आहेत. निवडणूक आयोगाविरोधातील या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांच्याकडून केले जात असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

दरम्यान, बाळा नांदगावकर यांनी यापूर्वी काढण्यात आलेल्या ‘सत्याचा मोर्चा’प्रमाणेच हा मोर्चाही निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करणारा असल्याचे स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रियेबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण झाली असून नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Uddhav and Raj Thackeray to share the same stage; major change for today’s rally following a police request.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात