परवानगी नाकारली, तरी आंदोलन केलं; अभिजीत दिपकेंच्या अडचणी वाढल्या, नेमकं प्रकरण काय?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क परिसरात परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन केल्याप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. २ ऑक्टोबर रोजी झालेल्या ‘जेल भरो’ आंदोलनासंदर्भात अभिजीत दिपके, सौरभ दास, आशुतोष रांका आणि रत्ना सिंह यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील सिद्धी देवळेकर यांनी ही तक्रार दिल्याची माहिती आहे. Abhijit Dipke

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदवत सीजेपीने हे आंदोलन आयोजित केले होते. मात्र, मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती.



पोलिसांनी परवानगी का नाकारली होती?

शिवाजी पार्क येथे आंदोलनासाठी मुंबई महापालिकेची आवश्यक परवानगी नसणे, वाहतूक कोंडी होण्याची शक्यता, ध्वनिप्रदूषण आणि परिसरातील रुग्णालयांकडे जाणाऱ्या मार्गांवर परिणाम होण्याची भीती, अशी कारणे पोलिसांनी परवानगी नाकारताना दिली होती. असे असतानाही सीजेपीकडून २ ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्यात आले.

तक्रारीत नेमके काय आरोप?

दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, अभिजीत दिपके, सौरभ दास, आशुतोष रांका आणि रत्ना सिंह यांनी विनापरवानगी गर्दी जमवली. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक ११६/२००९ मध्ये ४ जानेवारी २०१३ रोजी दिलेल्या निकालाचे आणि राज्य सरकारच्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

आंदोलनाला शांततापूर्ण म्हणता येणार नाही, तसेच आंदोलनाच्या नावाखाली सरकारी आदेशांचे उल्लंघन करण्यात आले, असा दावाही तक्रारदारांनी केला आहे. संविधानाच्या रक्षणाचा दावा करणाऱ्यांनीच कायद्याचे आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

५०० आंदोलकांवरही कारवाई होणार?

या प्रकरणात अभिजीत दिपके यांच्यासह सुमारे ५०० सीजेपी आंदोलक कायदेशीर कारवाईच्या कक्षेत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या सर्वांविरोधात एफआयआर दाखल झाला आहे की त्यांच्यावर अन्य प्रकारची कायदेशीर कारवाई प्रस्तावित आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

त्यामुळे शिवाजी पार्क पोलिसांकडून या तक्रारीवर कोणती भूमिका घेतली जाते, दिपके यांना चौकशीसाठी बोलावले जाते का आणि पुढील कायदेशीर कारवाई काय होते, याकडे लक्ष लागले आहे.

Case filed against Abhijit Dipke over protest in Shivaji Park area

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात