जखमी होऊनही निडरपणे भिडले; 180 प्रवाशांचे विमान क्रॅश होण्यापासून वाचवले, नेत्यानाहूंनी भारतीय वैमानिकाचे केले कौतुक

Indian pilot

विशेष प्रतिनिधी

मुंबई : विमानाच्या कॉकपिटमध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर भारतीय वंशाचे वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांनी दाखवलेल्या धैर्याचे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी कौतुक केले आहे. दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या प्रवासी विमानाला संभाव्य दुर्घटनेपासून वाचवण्यात कॅप्टन स्मित मच्छर यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यात जखमी होऊनही त्यांनी प्रतिकार करत कॉकपिटवरील नियंत्रण कायम ठेवले आणि हल्लेखोराला रोखण्यात मदत केली. Indian pilot

नेत्यानाहू यांनी कॅप्टन मच्छर यांच्या धैर्याचे कौतुक करत त्यांना ‘खरा नायक’ संबोधले. “गंभीररीत्या जखमी होऊनही त्यांनी प्रतिकार केला. त्यांच्या धैर्यामुळे विमानातील प्रवासी आणि क्रू सदस्यांना हल्लेखोरावर नियंत्रण मिळवता आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला,” अशा आशयाची प्रतिक्रिया नेत्यानाहूंनी दिली.

कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं?

दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या विमानासंदर्भात नियंत्रण कक्षाला विमान हायजॅक झाल्याचा संदेश मिळाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन इस्रायली लढाऊ विमानांनी विमानाला एस्कॉर्ट केले. अखेर विमान सौदी अरेबियातील विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आल्याची माहिती समोर आली.

यानंतर विमानातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विमानाचा ओमानचा को-पायलट कॉकपिटवर नियंत्रण मिळवून विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे. मात्र, कॅप्टन स्मित मच्छर यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला.

या झटापटीदरम्यान ओमानच्या को-पायलटने कॅप्टन मच्छर यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात मच्छर जखमी झाले. मात्र, जखमी अवस्थेतही त्यांनी माघार घेतली नाही. त्यांनी प्रतिकार करत हल्लेखोराला रोखले आणि कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले. त्यानंतर विमानातील प्रवासी आणि क्रू सदस्यांनी मिळून हल्लेखोरावर नियंत्रण मिळवल्याचे सांगितले जात आहे.

‘त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले’

या घटनेनंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी कॅप्टन स्मित मच्छर यांच्या धैर्याला सलाम केला. गंभीर जखमी असूनही त्यांनी परिस्थितीचा सामना केल्यामुळे विमानातील प्रवासी आणि क्रू सदस्यांचे प्राण वाचल्याचे नेत्यानाहूंनी म्हटले.

कॅप्टन मच्छर यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थनाही नेत्यानाहूंनी व्यक्त केली. त्यांना ‘खरा नायक’ असे संबोधत त्यांच्या धैर्याचे कौतुक करण्यात आले.

2022 पासून फ्लाय दुबईमध्ये कार्यरत

भारतीय वंशाचे कॅप्टन स्मित मच्छर हे 2022 मध्ये फ्लाय दुबईमध्ये वैमानिक म्हणून रुजू झाले. त्यापूर्वी त्यांनी सुमारे दहा वर्षे स्पाइसजेटमध्ये पायलट म्हणून काम केल्याची माहिती आहे. सध्या ते कुटुंबासह दुबईत वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, विमानातील या घटनेची अधिकृत चौकशी सुरू असून कॉकपिटमध्ये घडलेल्या संपूर्ण प्रकारामागील नेमकी कारणे आणि हल्लेखोराचा उद्देश तपासला जात आहे.

Indian pilot saved plane carrying 80 passengers from crashing; Netanyahu praised him.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात