राज्यात सध्या सुरू असलेल्या इंधन टंचाईच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन त्यांनी पंढरपूर येथून केले आहे. इंधनाची उगाचच साठवणूक करण्यापेक्षा गरजेनुसारच खरेदी करावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. अमितजींना माझ्या खूप-खूप शुभेच्छा, पण त्यांनी ‘मातोश्री’पासून जरा सांभाळून राहावे, असा खोचक सल्ला रामदास कदम यांनी दिला. या राजकीय टोलेबाजीसोबतच, सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरलेल्या एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबतही त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचा भव्य शुभारंभ आणि कोनशिला अनावरण करण्यात आले.
साईबाबांच्या शिर्डीत भक्ती आणि शक्तीचा संगम झाला. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज शिर्डी, अहिल्यानगर येथे निबे ग्रुप आणि विविध कंपन्यांदरम्यान करार करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत मी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. महायुतीत कोणताही वाद निर्माण होईल अशी संधी देऊ नका, असे त्यांनी मला सांगितले आहे. मी त्यांच्या या आदेशाचे तंतोतंत पालन करेन. एकनाथ शिंदे हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांनी मला ‘सुनावले’ असा त्याचा अर्थ होत नाही. त्यांनी दिलेला आदेश पाळणे हे माझे कर्तव्य आहे, अशी सावध प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. यापुढे राष्ट्रवादीबाबत परिस्थितीनुसार बोलेन, पण शिंदे साहेबांना विचारूनच बोलेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापू लागले असून मनोज जरांगे पाटील यांच्या आगामी आमरण उपोषणाच्या घोषणेनंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. 30 मेपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेत चर्चा केली. मात्र या भेटीनंतर ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी संतप्त प्रतिक्रिया देत जरां
राज्यात वाढत्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना तातडीच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक तेवढे डिझेल वेळेत उपलब्ध करून द्यावे आणि त्यांच्या कामात कोणताही अडथळा येऊ देऊ नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. ग्रामीण भागात पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्याबाबत माध्यमांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात सरकार गंभीर असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या नावाखाली कुणी इंधनाची साठेबाजी करत असेल, तर त्यावर कडक लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
सोशल मीडियावरील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) माध्यमातून देशातील व्यवस्था व बेरोजगारीवर तिखट हल्ला करणाऱ्या अभिजीत दीपके यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. दीपके यांनी स्वतः या धमकीचा स्क्रीनशॉट शेअर केल्यामुळे देशात खळबळ माजली आहे. परिणामी, खबरदारी म्हणून पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज येथील त्यांच्या निवास्थानी बंदोबस्त वाढवला आहे.
रयत शिक्षण संस्थेत पवारांची मक्तेदारी अध्यक्ष पदावर आणली नातवाची पिढी!!, अशी घडामोड नुकतीच घडवून आणली गेली.
वारकरी संप्रदायाविरुद्ध वादग्रस्त आणि प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे.
पुण्यात एका महिलेवर कथित ॲसिड हल्ला आणि तिच्यावर झालेला अत्यंत क्रूर घरगुती छळ यांबाबत माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली असून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून संबंधित गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मान्सूनपूर्व तयारी आणि आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा बैठक झाली.
शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या परिवाराने विकसित केलेल्या बारामतीत गुन्हेगारी प्रवृत्ती आणि ड्रग्स तस्करी वाढल्या असल्याचे दिसून येत असून पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामती मध्ये धडक कारवाई करून गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय पथकाने शुक्रवारी पुण्यातील शुक्रवार पेठेतील रहिवासी, एनटीएची फिजिक्सची पेपरसेटर मनीषा हवालदारला अटक केली. नीट प्रकरणात महाराष्ट्रातील ही सातवी अटक आहे. दरम्यान, लातूरमध्ये सीबीआयने शुक्रवारी एका बीएएमएस डॉक्टर व बालरोग तज्ज्ञाची कसून चौकशी केली. या बालरोगतज्ज्ञाच्या मुलाने पेपर संपताच नोट्स विकल्याचे सांगितल्यामुळे पथक रद्दीवाल्याच्या दुकानातही पोहोचले होते. दरम्यान, परभणी, हिंगोली येथेही शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने छापे टाकले.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे एकूण उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत २६.४२ टक्क्यांनी वाढले, तर जोखीम तरतुदींपूर्वीचा खर्च २७.६० टक्क्यांनी वाढला. ३१ मार्च २०२६ रोजी बँकेचा ताळेबंद २०.६१ टक्क्यांनी वाढून ९१,९७,१२१.०८ कोटी रुपये झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत आज मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे कृषी विभागाच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे लोकार्पण केले आहे.
सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलाइड्स आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे आयोजित ‘सायप्रस-इंडिया बिझनेस फोरम’मध्ये प्रमुख उपस्थिती दर्शवली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘एमओयू सायनिंग सेरेमनी फॉर ट्रान्सफॉर्मिंग स्किल्स इकोसिस्टम इन महाराष्ट्र’ या कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत विविध संस्था आणि विभागांमध्ये आणि कोरिया प्रजासत्ताकच्या संस्थांदरम्यान करार करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसवर पवार कुटुंबीयांचा संपूर्ण कब्जाचा डाव बारगळला; कारण सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत त्याच्या खुणा दिसल्या!!, असेच आज नवी दिल्लीत घडले.
भारतातून टॉफीची निर्यात गेल्या 12 वर्षांत 166% वाढून आर्थिक वर्ष 2025-26 (FY26) मध्ये ₹132 कोटींवर पोहोचली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज, म्हणजेच 20 मे रोजी, सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे. आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये देशातून टॉफीची एकूण निर्यात ₹49.68 कोटी होती.
सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायप्रस – इंडिया बिझनेस फोरम येथे विविध संस्थांदरम्यान सामंजस्य करार करण्यात आले.
मी कधीच स्वतःहून कोणाला चर्चेसाठी निमंत्रण देत नाही. परंतु, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या बोलण्यात एक आपुलकी आणि माया दिसून आली, तसेच मुख्यमंत्र्यांकडून 100 टक्के मागण्या मान्य करून घेऊ असा शब्द त्यांनी दिला. म्हणूनच समाजाने त्यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. आता त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये आणि सरकार किंवा पक्षासाठी मराठा समाजाशी दगाफटका करू नये, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. प्रसाद लाड यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही गावो
राज्य शासनाने भूमी अभिलेख विभागाचा ‘मेगा’ विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विभागाच्या सुधारित आकृतिबंधानुसार राज्यात तब्बल ५० नवीन कार्यालयांच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. यामुळे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला १०,६८३ पदांचा आकृतिबंध आता प्रत्यक्ष अस्तित्वात आला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मात्र आमदार रोहित पवार यांनी पाथ फिरवल्याचे पाहायला मिळाले. शरद पवारांनी अजित पवार गटातील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची काही दिवसांपूर्वी स्तुती केली होती, त्यामुळे रोहित पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यात त्यांनी या बैठकीला दांडी मारल्याने नाराजीच्या चर्चेला उधाण आले आहे. तर पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी बैठकीबाबत पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App