TET Paper Leak : TET पेपरफुटीप्रकरण; शिक्षणमंत्री भुसे यांच्या बंगल्याबाहेर युवक काँग्रेसचे जोरदार आंदोलन; ‘पेपरचोर गद्दीछोड’ची घोषणाबाजी

TET Paper Leak

विशेष प्रतिनिधी

मुंबई : TET Paper Leak राज्यातील TET परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनेविरोधात आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयासमोर तसेच शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.TET Paper Leak

NEET नंतर आता TET चा पेपर फुटला आहे. प्रत्येक परीक्षेचे पेर फुटत आहेत. वारंवार होत असलेल्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले जात असून सरकारच्या निष्काळजी आणि अपयशी कारभाराचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला. प्रंचड पोलिस बंदोबस्त असतानाही गनिमी काव्याने शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर पोहोचून झीनत शबरीन यांनी बंगल्याच्या सुरक्षा भिंतीवर “दादा भुसे राजीनामा द्या” असे पोस्टर फडकावले व भुसे राजीनाम्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी “पेपरचोर गद्दीछोड”, “दादा भुसे राजीनामा द्या”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनकर्त्यांनी बंगल्यासमोरील परिसरात “पेपरचोर गद्दीछोड” अशा घोषणा लिहून सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.TET Paper Leak



यावेळी बोलताना झीनत शबरीन म्हणाल्या की, भाजप सरकारच्या काळात पेपरफुटी ही नित्याची बाब झाली आहे. NEET नंतर आता TET परीक्षेचाही पेपर फुटल्याने लाखो विद्यार्थ्यांचे कष्ट, वेळ आणि भविष्य धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि सरकारने निष्पक्ष चौौकशी करून पेपरफुटीमागील संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करून दोषींवर कठोर कारवाई करावी.

प्रचंड पोलिस बंदोबस्त असतानाही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करत भुसे यांचया बंगल्यासमोर पोहोचून आंदोलन केले. पोलिसांनी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि पेपरफुटीला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होईपर्यंत युवक काँग्रेसचा लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

आरोपी दिल्लीहून आले, 1.5 कोटींची होती मागणी, आंतरराज्य टोळीतील तिघांना अटक

राज्यात 28 जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता (TET) परीक्षेचा पेपरफुटीचा मोठा कट भिवंडी पोलिसांनी उधळून लावत तीन आरोपींना अटक केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे कोनगाव पोलिसांनी सापळा रचून आरोपींकडून प्रश्नपत्रिकेचे चार संच जप्त केले. शिक्षण विभागाने पडताळणी केल्यानंतर हेच मूळ प्रश्नपत्रिका असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, आरोपींनी हा पेपर विकण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांच्या आगाऊ रकमेची मागणी केली होती. हे पेपर पुढे विविध उमेदवारांना विकण्याचा त्यांचा कट होता.

अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी एक आरोपी हरियाणाचा, तर दोघे बिहारचे असून ते दिल्लीहून प्रश्नपत्रिका घेऊन भिवंडीत आले होते. आरोपींकडून मोबाईल फोन, डेबिट-क्रेडिट कार्डसह अन्य साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून त्याचे नेतृत्व डीसीपी पवन बनसोड करणार आहेत. पेपर दिल्लीतून कसा बाहेर आला, शिक्षण विभागातील कोणाचा सहभाग आहे का आणि या रॅकेटचे आणखी धागेदोरे कोणते, याचा तपास सुरू आहे. विविध राज्यांमध्येही पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

TET Paper Leak: Youth Congress Staged Aggressive Protest Outside Dada Bhuse’s Bungalow

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात