विशेष प्रतिनिधी
पुणे : इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली असून, माजी खासदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव बाजीराव पाटील यांचे पुतणे आणि भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्ह्यातील नेते मयूरसिंह पाटील यांनी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि पुण्याचे निरीक्षक सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. BJP in Pune district
मयूरसिंह पाटील हे भारतीय जनता पक्षाचे कोअर कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी पक्ष संघटनेत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रासोबतच सहकार क्षेत्रातही त्यांचा अनुभव आहे.
त्यांनी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसेच इंदापूर तालुका दूध उत्पादक संघाचे माजी चेअरमन म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रात त्यांचा परिचय आहे.
गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिवसा’चा भव्य सोहळा; गडचिरोली 100 टक्के नक्षलमुक्त होऊन ‘स्टील सिटी’ म्हणून पुढे येत आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लहू अण्णा निवंगुणे आणि पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेशजी पवार यांच्या प्रयत्नांतून मयूरसिंह पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
भाजपच्या जिल्हा संघटनेत महत्त्वाची जबाबदारी सांभाळलेल्या मयूरसिंह पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात या प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले आहे.
यावेळी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मयूरसिंह पाटील यांचे पक्षात स्वागत केले.
मयूरसिंह पाटील यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे इंदापूर आणि पुणे जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची नवी घडामोड!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App