पित्याच्या मृत्यूने शोकाकूल झालेल्या मुलीची पित्याच्या चितेवर उडी, राजस्थानातील घटनेने सारे सुन्न

बारमेर : मातृछत्र हरपल्यानंतर कोरोनामुळे काही महिन्यांत पित्याचा बळी गेल्यानंतर त्याच्या चितेवर मुलीने उडी घेण्याची ह्रदयद्रावक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. ही मुलगी त्यात भाजली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. Sad girl try to suicide after fathers death


कोरोना संकटात राज्यात दिलासादायक चित्र, १५ जिल्ह्यांतील दैनंदिन रुग्णसंख्येत घट, लसीकरणाबाबतही आरोग्यमंत्री टोपेंची महत्त्वाची घोषणा


बारमेरचे रहिवासी दामोदरदास शारदा (वय ७३) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांना दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या तीन मुलींमधील सर्वांत धाकट्या असलेल्या ३४ वर्षीय मुलीने अंत्यसंस्काराला जाण्याचा हट्ट धरला. स्मशानभूमीत गेल्यानंतर तिला दुःख अनावर झाले. तिने चितेवर उडी घेतल्यानंतर उपस्थित लोकांनी तिला खेचून बाहेर काढले, पण तोपर्यंत ती ७० टक्के भाजली होती.

या महिलेला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर तिला जोधपूरला हलविण्यात आले. महिलेच्या या कृत्यांने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे सध्या सर्वत्र निराशेचे मळभ दाटले असून नागरिकांना मानसिक् स्वास्थ टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी यात शंका नाही.

Sad girl try to suicide after fathers death

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात