गोकुळच्या निवडणुकीत महायुती एकसंध; चंद्रकांत पाटलांनी केला मोठा खुलासा, म्हणाले…

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीला आता वेग आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीतील राजकीय समीकरणांबाबत महत्त्वाची माहिती दिली. महायुतीतील सर्व पक्ष एकत्र असून, ‘राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी’ या नावाने निवडणूक लढवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “महायुतीमध्ये कधीही शंका नव्हती. राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी या नावाने आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. महायुतीचे सर्व नेते करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडणार आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.

तसेच जागावाटपाबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे पाटील यांनी सांगितले. “आजची बैठक कोणाला किती जागा मिळणार यासाठी झाली. आता आमच्यात मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ कोणीही नाही. महायुतीतील सर्व पक्ष एकत्र आहेत,” असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.


‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप


गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. ८ ऑक्टोबरला निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल,” असे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, गोकुळ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडी आणि महायुती यांच्यात थेट राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे. १८ ऑक्टोबरला मतदान, तर १९ ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून गोकुळच्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर सर्व पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे स्पष्ट झाले आहे.

गोकुळच्या मागील निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील विविध विरोधकांना एकत्र आणत महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील अनेक वर्षांची सत्ता उलथवून लावली होती. त्यानंतर राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांचा परिणाम गोकुळच्या राजकारणावरही झाला आहे.

त्यामुळे यंदाची गोकुळ निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. महायुतीची एकजूट आणि सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडी यांच्यातील लढतीकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Mahayuti united for the Gokul election; Chandrakant Patil makes a major revelation, says…

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात