अखेर दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा मार्ग मोकळा; फडणवीसांचा मोठा खुलासा

Fadnavis

विशेष प्रतिनिधी

अमरावती: अमरावती विभागातील सर्वच जिल्ह्यांना दुष्काळाची झळ पोहोचली असून पिके संकटात आली आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य शासनाकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. दुष्काळाच्या संहितेतील ‘ट्रिगर-१’नुसार देण्यात येणाऱ्या मदतीचा आदेश उद्याच काढण्यात येईल, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

वाशिम येथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासोबत अमरावती विमानतळावर चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या उपाययोजनांची माहिती दिली.

“शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्राच्या मदतीची वाट पाहिली जाणार नाही. राज्य शासनाकडून तातडीने मदत देण्यात येईल,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. केंद्राच्या मदतीसाठी आवश्यक असलेले पंचनामे आणि इतर प्रक्रिया पूर्ण करून केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

चाराटंचाई आणि पाणीटंचाईवरही उपाययोजना

अमरावती विभागातील अनेक भागांत दुष्काळाची तीव्रता असल्याने शेतकऱ्यांना तातडीने मदत देणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आगामी काळात चाराटंचाई आणि पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासोबतच गरज भासल्यास अन्नधान्याचीही मदत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणात दुष्काळामुळे खंड पडू नये, यासाठी थेट मदत करण्याचेही नियोजन करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

रब्बी पिकांसाठीही सरकारची तयारी

उपलब्ध पाण्यावर काही भागांत रब्बीची पिके घेता येतील का, याची तपासणी करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी रब्बी पिके घेणे शक्य आहे, त्या शेतकऱ्यांना आवश्यक मदत दिली जाईल.

दुष्काळाच्या काळात ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात येणार आहे. आटलेल्या जलसाठ्यांमधील गाळ काढणे, आवश्यक ठिकाणी जलतारा स्ट्रक्चर उभारणे तसेच दुरुस्तीची गरज असलेल्या तलावांची दुरुस्ती करण्यासाठी कामे हाती घेण्यात येतील.


‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप


दिवाळीपूर्वी मदत देण्याचे नियोजन

अमरावती विभागातील विविध भागांमध्ये पिकांची परिस्थिती मोठ्या प्रमाणात समान असल्याने राज्य शासनाने मदतीचे धोरण आखले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत दिवाळीपूर्वी मिळावी, यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.

दरम्यान, राज्य शासनाने कर्जमाफी केली असून कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांनी नियमानुसार नव्याने कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शासकीय दराने शेतमाल खरेदी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी शासकीय दराने खरेदी केली जाणार आहे. यासाठी लवकरच नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयातील आगप्रकरणाचा अहवाल होणार सार्वजनिक

दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेबाबतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली. या घटनेचा अहवाल सार्वजनिक केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Finally, the path for aid to drought-affected people is cleared; Fadnavis makes a major disclosure.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात