सीसीटीव्ही फुटेजमध्ये हाणामारीत कुस्तीगीर सुशीलचा सहभाग असल्याचे स्पष्ट, दिल्ली पोलिसांची पकडण्यासाठी मोहीम


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – ऑलिंपिक विजेता कुस्तीगीर सुशील कुमार याला ताब्यात घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीगीरात झालेल्या झटापटीत माजी राष्ट्रीय कुमार विजेत्या कुस्तीगीराचा मृत्यू झाला आहे. त्याबाबत सुशीलवरही आरोप दाखल करण्यात आला आहे.

मालमत्तेवरून झालेल्या वादंगात सुशील आणि मृत सागर यांच्या पाठीराख्यांत हाणामारी झाली. यात पाच जण जखमी झाले. यावेळी गोळीबारही झाला होता. माजी राष्ट्रीय कुमार विजेता असलेला सागर दिल्लीतील हेड कॉन्स्टेबलचा मुलगा आहे. पोलिस सुशीलचा शोध घेत आहेत. त्यांनी सुशीलच्या घरीही चौकशी केली आहे. सूत्रांनी स्टेडियममध्ये कोणीही घुसखोरी केलेली नव्हती. आरोपी हे काही जणांना स्टेडियममध्ये घेऊन गेल्याचे स्पष्टपणे दिसते, असेही सांगितले.

सुशील कुमारने आपला या घटनेशी कोणताही संबंध नाही असे बुधवारी सांगितले होते, एवढेच नव्हे तर छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या भांडणात कुस्तीगीर नव्हते, असा दावा केला होता, पण आता घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्या फुटेजमधील हाणामारीत सुशीलचा सहभाग असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, असे दिल्ली पोलिसांनी सांगितल्याचे समजते. पण यास दिल्ली पोलिसांनी अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात