तृणमुलमधून आलेल्या कचऱ्यामुळे भाजपचा पराभव, तथागत रॉय यांचा प्रदेश नेतृत्वावर निशाणा


विशेष प्रतिनिधी

कोलकता– पश्चि म बंगालमध्ये आता पराभवामुळे भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व त्रिपुराचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, शिव प्रकाश, अरविंद मेनन आणि प्रभारी कैलास विजयवर्गीय यांच्यासह पक्षाच्या अन्य नेत्यांच्या निर्णयावर सवाल उपस्थित केले आहेत. Tathagat roy target bjp leadership

१३० कोटी लोकसंख्येच्या देशात केंद्रीय नेतृत्व जो आदेश देतो, त्याचे पालन राज्यातील नेतेच करतात, पण येथे असे झाले नाही. बंगालमधील भाजपचे जे नेते आहेत, त्यांना काहीही माहीत नाही, अशी टीका करीत रॉय यांनी म्हटले आहे की राज्यात भाजप मागे पडण्याचे एक कारण कारण म्हणजे भाजपच्या छताखाली आलेला तृणमूलमधील कचरा हे आहे. 

भाजपचे कार्यकर्ते १९८०पासून पक्षासाठी सातत्याने काम करीत होते, त्यांना तृणमूल काँग्रेसचा त्रास सहन करावा लागत आहे. पण भाजपचे ‘कैलास-दिलीप-शिव- अरविंद’ (केडीएसए) त्यांच्या बचावासाठी पुढे आले नाहीत, त्यांना काम करण्यास उभारीही दिली नाही. उलट ‘तृणमूल’मधून आलेल्या कचऱ्याला निवडणुकीचे तिकीट देण्यात आणि त्यांना सप्ततारांकित हॉटेलमध्ये आराम करता यावा, यासाठी ते झटत होते. आता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अत्याचार, छळाला सामोरे जावे लागत आहे, असे रॉय यांनी सांगितले.

Tathagat roy target bjp leadership

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात