सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाला फटकारले, भाषेवर संयम ठेवण्याचा सल्ला


नवी दिल्ली : निवडणूक आयोगाबाबत केलेल्या टिप्पणीवरून सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाला फटकारले. कोरोनाच्या् प्रादुर्भावाला निवडणूक आयोग जबाबदार असून तुमच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करायला हवा, हे विधान अत्यंत कठोर व अयोग्य असून न्यायाधीशांनी संयम बाळगण्याची गरज आहे. न्यायालयीन कामकाजामध्ये कठोर वक्तव्ये करण्याची गरज नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावले. Supreme court lashed on Madras high courtविधानसभा निवडणुकीसंबंधी उच्च न्यायालयाने तिखट शब्दांत आयोगावर ताशेरे ओढले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. ही टिप्पणी अतिशय कठोर होती, असे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. अशा शेरा चुकीच्या अर्थ लावण्यासाठी संवेदनक्षम आहे. मद्रास उच्च न्यायालयाने निकाल आणि खंडपीठाच्या भाषेवर संयम ठेवायला हवा होता आणि संवेदनशील राहायला हवे होते, असेही न्यावयालय म्हणाले.

निवडणूक आयोगाला मद्रास उच्च न्यायालयाच्या वक्तव्याविषयी तक्रार आहे. तो कोणत्याही आदेशाचा भाग नाही आणि त्याला अर्थही नाही त्यामुळे त्याला रेकॉर्डवरुन हटवण्याची गरज नाही असे सांगत ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने निकालात काढली.

Supreme court lashed on Madras high court

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात