उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

उज्ज्वल निकम यांना उमेदवारी; माध्यमे म्हणतात पूनम महाजनांचा पत्ता कट, पण हा तर खरा माध्यमांना न समजलेला त्यांच्या डोक्याच्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!, ही खरी आजची घडामोड आहे.BJP ticket to ujjwal nikam, real master stroke beyond understanding of “pawar limited intelligence”!!

एरवी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी कुठलीही “लोकल” खेळी केली तरी पवारांनी “मास्टर स्ट्रोक” मारला, अशी मखलाशी “पवार बुद्धी”ची मराठी प्रसार माध्यमे करत असतात. पण भाजपने उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांच्यासारखा निष्णात आणि कसलेला वकील मैदानात उतरवला याची साधी भनकही मराठी माध्यमांना लागली नव्हती, पण ज्यावेळी भाजपने उज्ज्वल निकमांची उमेदवारी जाहीर केली, त्यावेळी देखील माध्यमांनी पूनम महाजनांचा पत्ता भाजपने कट केला, एवढीच मखलाशी केली. त्यापलीकडे उज्ज्वल निकमांच्या उमेदवारीतून भाजपने नेमके काय साधून घेतले किंवा भाजपला नेमके काय साध्य करायचे आहे??, याविषयी माध्यमांनी कुठलेही भाष्य केले नाही. किंवा करायची कुवतही दाखविली नाही.



खरं म्हणजे उज्ज्वल निकमांच्या आत्तापर्यंतच्या वकिली हाय प्रोफाईलचा साधा आढावा जरी घेतला, तरी भाजपचा नेमका “मास्टर्स स्ट्रोक” कुठे आणि कसा आहे आणि तो कुठे बसला आहे??, हे समजून येईल. त्यासाठी फार मोठ्या रॉकेट सायन्सचा अभ्यास करण्याची गरज नाही. पण तेवढाही साधा अभ्यास करण्याची “पवार बुद्धी”च्या माध्यमांची तयारी नाही. उज्ज्वल निकम यांनी आत्तापर्यंत ज्या पद्धतीचे आणि ज्या प्रकारचे खटले लढवलेत आणि ते यशस्वी झालेत, ते पाहता उज्ज्वल निकम यांची दहशतवादा विरोधातली लढाई किती गंभीर आणि किती “उज्ज्वल” आहे हे नव्याने सांगण्याची फार गरज नाही.

दाऊद इब्राहिमच्या विरोधातला मुंबई बॉम्बस्फोटाचा खटला असो, कसाब विरोधातला मुंबई हल्ल्याचा खटला असो, अथवा याकूब मेमनच्या विरोधातला दहशतवादी हल्ल्याचा खटला असो, हे सगळे खटले उज्ज्वल निकमांनी यशस्वी करून दाखविले, इतकेच नाही, तर सामाजिक न्यायाच्या लढाईत देखील ते नेहमीच आघाडीवर राहिले. अशा वेळी भाजप त्यांचा थेट लोकसभेसाठी विचार करेल आणि त्यांना उत्तर मध्य मुंबई सारख्या हाय प्रोफाईल मतदारसंघातून उमेदवारी देईल, याची साधी भनकही मराठी माध्यमांना लागली नव्हती. त्याची चर्चाही माध्यमांनी केली नव्हती. फक्त महायुतीत तिढा कायम, अजून 9 जागांवर उमेदवाराच मिळेनात, वगैरे बातम्यांची पेरणी माध्यमांनी केली, पण त्यापलीकडे उज्ज्वल निकम यांच्यासारखे एक बुलंद नाव भाजप आपल्या यादीत आणेल, असे कोणीही बातम्यांमध्ये नमूद केले नव्हते.

बाकी बातम्यांमध्ये याचा पत्ता कट, त्याचा पत्ता कापला, त्याचे पंख कापले वगैरे भाषेची पखरण या बातम्यांमध्ये होती.

पण भाजप कुठलीही निवडणूक स्ट्रॅटेजी किंवा कायदेविषयक स्ट्रॅटेजी अशी कोणाचे पत्ते कापायला, पत्ते कट करायला किंवा पंख कापायला आखत नाही. त्यामागे कुठले तरी दीर्घ नियोजन असते, हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. पूर्वी काँग्रेसचे नेते देखील त्याच पद्धतीने विचार करून आपली स्ट्रॅटेजी आखत असत. कारण त्यावेळी इंदिरा गांधी किंवा नरसिंह राव यांच्यासारखे सारखे नेते काँग्रेसच्या सर्वोच्च स्थानी होते. पण आता ती परिस्थिती उरलेली नाही. त्यामुळे काँग्रेस बद्दल इथे बोलण्याचे कारण आणि प्रयोजन नाही.

पण भाजपने पुनम महाजनांचा पत्ता कापण्यासाठी उज्ज्वल निकमांना उमेदवारी दिली, ही मखलाशी चुकीची आहे. उलट उज्ज्वल निकम यांच्यासारख्या कसलेल्या आणि ज्येष्ठ विधीज्ञाचा ज्ञानाचा अनुभवाचा वापर केंद्रीय पातळीवर करून घेण्याचा पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या इतर नेतृत्वाचा मनसूबाच यातून दिसतो. भाजपला मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये भरपूर कामे उरकायची आहेत आणि ती कामे कायद्याच्या कसोटीवर कठीण आणि जिकीरीची आहेत. उदाहरणेच द्यायची झाली, तर 1991 चा प्रार्थना स्थळ कायदा आहे, लव्ह विरोधातील कायदा आहे, इतकेच नाही तर समान नागरी कायद्याची अंमलबजावणी आहे, भारतीय नागरिक संहिता अर्थात सीएए हा कायदा आहे, या या कायद्यांमध्ये दुरुस्ती अथवा त्यांची अंमलबजावणी कायदेशीर किस पाडणारी आहे आणि अशावेळी उज्ज्वल निकम यांच्यासारखा कायद्यात मुरलेला मोहरा लोकसभेत हाताशी असणे मोदींसाठी फार महत्त्वाचे आहे.

पंतप्रधान मोदी उज्वल निकमांना भविष्यात काही फार मोठी जबाबदारी देतील किंवा न देतील हा भाग अलहिदा, पण उज्ज्वल निकम यांच्या लोकसभेच्या अस्तित्वामधून संपूर्ण देशभर एक विशिष्ट संदेश तर निश्चित गेला आहे, तो म्हणजे भारतात सामाजिक न्यायाच्या बाजूने आणि दहशतवादाविरुद्ध कणखरपणे लढा देणाऱ्या ज्ञानवंत वकिलाचा भाजपने सन्मान केला आहे. उज्ज्वल निकमांची लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करताना भाजपने खेळलेला हा खरा “मास्टर स्ट्रोक” आहे. तो केवळ पुनम महाजन यांचा पत्ता कापण्याचा “लोकल स्ट्रोक” नाही!!, तर त्यापलीकडचा मोदींच्या टीम मध्ये एक कायद्याचा बळकट हात आणण्याचा “मास्टर स्ट्रोक” आहे. हा “मास्टर स्ट्रोक” “पवार बुद्धी”च्या पलीकडचा आहे!!

BJP ticket to ujjwal nikam, real master stroke beyond understanding of “pawar limited intelligence”!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात