सनी लियोनी कामगारांसाठी करणार हे काम, दहा हजार जणांना देणार जेवण


प्रसिध्द अभिनेत्री सनी लियोनीने पेटा (पिपल फॉर एथिकल ट्रिटमेंट यू अ‍ॅनीमल्स) या संस्थेच्या कार्यात सहभागी झाली आहे. राजधानी दिल्लीत १० हजार प्रवासी मजुरांच्या जेवणाची व्यवस्था सनी लियोनी करणार आहे.Sunny Leone will do this work for the workers, giving food to ten thousand people


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : प्रसिध्द अभिनेत्री सनी लियोनीने पेटा (पिपल फॉर एथिकल ट्रिटमेंट यू अ‍ॅनीमल्स) या संस्थेच्या कार्यात सहभागी झाली आहे. राजधानी दिल्लीत १० हजार प्रवासी मजुरांच्या जेवणाची व्यवस्था सनी लियोनी करणार आहे.

सनी लियोनीने म्हटले आहे की, आपण सर्व जण एका खूप मोठ्या संकटाचा सामना करत आहोत. यावेळी करणा आणि एकता हिच आपली ताकद बनेल. त्यातूनच आपण या संकटातून बाहेर पडू शकतो.त्यामुळेच पेटा इंडिया संस्थेसोबत पुन्हा एकदा काम करण्यात मला खूप आनंद होत आहे. आम्ही हजारो लोकांना प्रोटीनने भरपूर असलेले शाकाहारी भोजन पुरविणार आहोत.

याचे कारण म्हणजे महामारीच्या काळात लोकांना पौष्टिक जेवणाची गरज आहे. त्यामुळे आम्ही देणार असलेल्या जेवणात डाळ-भात किंवा खिचडी आणि फळांचाही समावेश असणार आहे.

सनी लियोनीला २०१६ मध्ये पेटा इंडियाने पर्सन ऑफ द ईयर या पुरस्काराने सन्मानित केले होते. या संस्थेच्या शाकाहार, कुत्री आणि मांजरांना दत्तक घेणे आणि नसबंदी करणे यासारख्या अभियानांत सनी सहभागी झाली होती.

Sunny Leone will do this work for the workers, giving food to ten thousand people

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण