West Bengal TMC violence : हिंसाचार सुरू होऊन ४८ तास उलटल्यानंतर ममतांना जाग; बंगालचे मुख्य सचिव, गृह सचिव, डीजीपींची बोलवली बैठक

वृत्तसंस्था

कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये तृणमूळ काँग्रेसच्या अभूतपूर्व विजयानंतर तृणमूळच्या गुंडांचा हिंसाचाराचा धुडगूस सुरू होऊन ४८ तास उलटल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हिंसाराचार रोखण्यासाठी जाग आली आहे. Mamata Banerjee has called a meeting today with Chief Secretary, Home Secretary, DGP, and Kolkata CP over post-poll violence in the state.

त्यांनी बंगालचे मुख्य सचिव, गृह सचिव, डीजीपी यांची बैठक बोलवली आहे. त्या त्यांच्याशी कोविड परिस्थितीवर चर्चा करून त्यावर उपाययोजना देखील शोधणार आहेत. या आधी कालच राज्यपाल जगदीप धनकर यांनी मुख्य सचिव, गृह सचिव, डीजीपी यांची राजभवनावर बैठक घेऊन त्यांना हिंसाचार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देखील हिंसाचारग्रस्त बंगालचा दौरा सुरू केला आहे. त्यांनी बंगालमधील सध्याच्या हिंसाचाराची तुलना भारत – पाकिस्तान फाळणीच्या वेळच्या हिंसाचाराशी केली. यानंतर ममता बॅनर्जी यांना जाग आली आणि राज्यातल्या त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्याची उपरती झाली.

बंगालमध्ये तृणमूळच्या विजयाबरोबर मुस्लीम बहुल ७ जिल्ह्यांमध्ये लूटालूट, हल्ले, जाळपोळ सुरू झाले. भाजपची कार्यालये, उमेदवार, कार्यकर्ते यांना ठरवून वेचून टार्गेट करण्यात आले. बीरभूम, गोपालपूर, दक्षिण २४ परगणा, मिदनापूर येथे हिंसाचार भडकल्याच्या बातम्या आल्या आहेत. जिल्ह्यातील गोपालनगरमध्ये भाजपचे पोलिंग एजंट दास यांच्या घरावर गुंडांनी हल्ला केला. त्याची माहिती त्यांची पत्नी शेफाली दास यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली.

तृणमूळ काँग्रेसच्या गुंडांना रान मोकळे

ममता बॅनर्जी उद्या ५ तारखेला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईपर्यंत तृणमूळच्या गुंडांना हिंसाचारासाठी मोकळे रान करून देण्यात आले आहे, असा गंभीर आरोप स्वपन दासगुप्ता यांनी केला आहे.

Mamata Banerjee has called a meeting today with Chief Secretary, Home Secretary, DGP, and Kolkata CP over post-poll violence in the state.