बड्या वृत्तसमुहांकडून फेक न्यूजद्वारे योगी आदित्यनाथांची बदनामी, म्हणे गोशाळांमध्ये गाईंची कोरोना तपासणी करण्याचे काढले आदेश


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बदनामी करण्याचा डाव देशातील आघाडीच्या माध्यमसमुहांकडून सुरू आहे. योगींनी आपला गोरक्षणाचा अजेंडा राबविण्यासाठी हेल्प डेस्क स्थापन करण्याच आदेश दिले आहेत. सर्व गोशााळांमध्ये कोरोना नियमावलीचे पालन करावे. थर्मल स्कॅनर आणि ऑक्सिमीटरद्वारे गाय आणि इतर पशुंची तपासणी करावी, अशी धादांत खोटी बातमी देण्यात येत आहे. प्रत्यक्षात गोशाळांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही व्यवस्था करावी असे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे.Big news groups defame Yogi Adityanath through fake news, say orders for corona inspection of cows in cowsheds


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बदनामी करण्याचा डाव देशातील आघाडीच्या माध्यमसमुहांकडून सुरू आहे. योगींनी आपला गोरक्षणाचा अजेंडा राबविण्यासाठी हेल्प डेस्क स्थापन करण्याच आदेश दिले आहेत.

सर्व गोशााळांमध्ये कोरोना नियमावलीचे पालन करावे. थर्मल स्कॅनर आणि ऑक्सिमीटरद्वारे गाय आणि इतर पशुंची तपासणी करावी, अशी धादांत खोटी बातमी देण्यात येत आहे. प्रत्यक्षात गोशाळांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही व्यवस्था करावी असे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे.



टाईम्स ऑफ इंडिया, ट्रिब्यून यासारख्या आघाडीच्या वृत्तसंस्थांनी या प्रकारच्या बातम्या दिल्या आहेत. मात्र, इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकारने ही सगळी व्यवस्था गोशाळांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी करण्यास सांगितले आहे.

इंडिया टूडेच्या वृत्तात म्हटले आहे की, अतिरक्ति मुख्य सचिव (माहिती) नवनीत सेहगल यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने अशाप्रकारचा कोणताही आदेश काढलेला नाही.

ऑक्सिमीटर आणि थर्मल स्कॅनर हे गोशाळांना पुरवावेत परंतु ते गायींसाठी नव्हे तर तेथे काम करणाऱ्यां कर्मचाऱ्यांसाठी असे म्हटले आहे. मात्र, याबाबत विपर्यस्त वृत्त देऊन निष्कारण बदनामी केली जात आहे.

उत्तर प्रदेशात निराधार गायींची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने गायींसाठी निवारागृहांची संख्या वाढविण्याचे आदेश दिले आहेत, असे उत्तर प्रदेश सरकारतर्फे कळविण्यात आले होते.

याच ठिकाणी चालू स्थितीत असलेल्या आणि नव्याने उभारण्यात येत असलेल्या गोशाळांमध्ये कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी असे म्हटले आहे. त्यांच्यसााठी हेल्प डेस्क तयार करून ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर पुरवावे, असे सांगण्यात आले. मात्र, अत्यंत खोडसाळपणे योगी आदित्यनाथ यांची बदनामी केली जात आहे.

गोवंशाच्या रक्षणासाठी योगी आदित्यनाथ ओळखले जातात. त्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशात अनेक योजनाही आखल्या आहेत. मात्र, कोरोना काळातही नागरिकांपेक्षा योगींना गाईंचे प्रेम जास्त आहे.

त्याचबरोबर गाईंना कोरोना होऊ शकतो आणि त्यांची तपासणी करत असल्याचे सांगून त्यांना निरक्षर ठरविण्याचा डाव आघाडीच्या वृत्तसमुहांनी आखला असल्याचा आरोप केला जात आहे.

Big news groups defame Yogi Adityanath through fake news, say orders for corona inspection of cows in cowsheds

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात