माणसे अगोदर; मग आस्था! कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथांची लक्षणीय टिपण्णी…


विशेष प्रतिनिधी

लखनौ : कोणताही धर्म असो त्यातील आस्थेपेक्षा माणूस प्रथम महत्वाचा आहे. मानवासाठी आस्था आहे, आस्थेसाठी मानव नाही. कोरोनाच्या काळात याचे भान सर्वांनी राखले पाहिजे असे स्पष्ट मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज व्यक्त केले. ते ही धर्माचार्य व साधू संताच्या बैठकीत. Yogi Adityanath urged to follow corona discipline

हरिद्वारमध्ये कुंभमेळ्यातील शाहीस्थानासाठी उद्या लाखो श्रद्धाळू एकत्र येत आहेत. तसेच उद्यापासून रमजानचा महिना सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर योगींच्या या वक्तव्याला विशेष महत्व आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील साधू संत व धर्माचार्याची व्हीडीओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. त्यात संबोधित करताना योगींनी कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्राधान्य दिले पाहिजे असे आग्रही प्रतिपादन केले.



त्यावेळी त्यांनी मानवजात ही महत्वाची आहे. सध्याच्या वैश्विक महामारीत मानव जातीपुढेच आव्हान निर्माण झाले आहे असे स्पष्ट शब्दांत मत व्यक्त केले. योगीजी म्हणले, सध्याच्या कोरोनाच्या काळात सर्व साधू सतांनी आपल्या आस्था काही काळ बाजूला ठेवल्या पाहिजेत. कारण मानवासाठी आस्था आहे आस्थेसाठी मानव नाही.

मानवजात शिल्लक रहिली नाही तर त्या आस्थेला काहीच किंमत नाही. त्यामुळे आपल्या भावनांना मुरड घालून सध्या केवळ कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याला सर्व साधूंनी प्राधान्य देण्याची गरज आहे असे स्पष्ट मत योगींनी व्यक्त केले.

Yogi Adityanath urged to follow corona discipline


विशेष बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात