अक्षयकुमार आणि सचिनने हॉस्पिटल बेड अडवून ठेवण्याची गरज नव्हती, त्यांनी घरीच उपचार घ्यायला हवे होते; अस्लम शेख यांची शेरेबाजी


वृत्तसंस्था

मुंबई – महाराष्ट्र कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या सावटाखाली असताना जनतेला दिलासा देण्याऐवजी ठाकरे – पवार सरकारमधील मंत्री वादग्रस्त विधाने करण्यात गुंतले आहेत. मुंबईचे पालकमंत्री, काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी असेच वादग्रस्त शेरेबाजी केली आहे. celebrities like Akshay Kumar, Sachin Tendulkar did not need to get admitted to the hospital. Beds should be left for the needy: Maharashtra Minister Aslam Sheikh

ज्या सेलिब्रिटींना कोरोना झाला आहे, त्यांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यापेक्षा त्यांच्या घरीच आयसोलेट होऊन उपचार घ्यावेत, अशी सूचना अस्लम शेख यांनी केली आहे. पण एवढी सूचना करूनच ते थांबले नाहीत. तर सेलिब्रिटींवर त्यांनी वेगळी शेरेबाजीही केली.ते म्हणाले, की अभिनेता अक्षयकुमार आणि क्रिकेट स्टार सचिन तेंडुलकर यांनी हॉस्पिटलमध्य़े दाखल होऊन बेड अडवून उपचार घेण्यापेक्षा त्यांच्या घरीच उपचार घ्यायला हवे होते. ते बेड त्यांनी गरजू व्यक्तींना द्यायला हवे होते, असे विधानही अस्लम शेख यांनी केले आहे.

अक्षयकुमार आणि सचिन यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे ट्विट केले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. सचिनला तर आता डिस्चार्जही मिळाला आहे. पण त्यानंतर अस्लम शेख यांनी त्या दोघांविषयी वरील शेरेबाजी केली आहे. त्यामुळे ते सोशल मीडियात टीकेचा विषय ठरले आहेत.

कोणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे नाही आणि कोणाला नाही, हे वैद्यकीय निकषांवर तज्ज्ञ डॉक्टरांना ठरवू द्या. तुम्ही मंत्री आहात म्हणून तुम्हाला ते ठरविण्याचा अधिकार मिळाल्याच्या अविर्भावात वागू नका, असा सल्ला एका यूजरने अस्लम शेख यांना त्यांच्या शेरेबाजीवरून दिला आहे.

celebrities like Akshay Kumar, Sachin Tendulkar did not need to get admitted to the hospital. Beds should be left for the needy: Maharashtra Minister Aslam Sheikh

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण