शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद देण्याची मागणी करून खळबळ उडवून दिली. याबाबत खुलासे-प्रतिखुलासे करताना राज्यातील कॉँग्रेस नेत्यांची दमछाक झाली. आता पवारांच्या यूपीए अध्यक्षपदाचा आणि त्यानिमित्ताने संजय राऊत यांनी केलेल्या आगाऊपणाचा मुद्दा कॉँग्रेसच्या बैठकीत गाजणार आहे.UPA presidency and Sanjay Raut’s lead will be discussed in Congress meeting!
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद देण्याची मागणी करून खळबळ उडवून दिली. याबाबत खुलासे-प्रतिखुलासे करताना राज्यातील कॉँग्रेस नेत्यांची दमछाक झाली.
आता पवारांच्या यूपीए अध्यक्षपदाचा आणि त्यानिमित्ताने संजय राऊत यांनी केलेल्या आगाऊपणाचा मुद्दा कॉँग्रेसच्या बैठकीत गाजणार आहे.राज्यातील कॉँग्रेस नेत्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींप्रतिच्या निष्ठा दाखविण्यासाठी राऊत यांच्यावर टीका करायला सुरूवात केली आहे. बैठकीच्या निमित्ताने त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
काँग्रेस पक्षाचे राज्य प्रभारी एच.के. पाटील व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पक्षाच्या मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे पंढरपूर पोटनिवडणूक: भावनिक मुद्द्यांवर होणार लढत युपीएच्या अध्यक्षपदाच्या चर्चांवरुन थोरात यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
महाविकास आघाडी सरकार होण्यात संजय राऊतांचा मोठा सहभाग असल्याचं आम्ही जाहीरपणे सांगतो. पण संजय राऊत एका बाजूला राजकारणी आहेत. पण त संपादकही आहेत. कदाचित राजकारणी आणि संपादक यामध्ये त्यांची गल्लत होते का काय असं वाटून जाते,
अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. त्यामुळं तीन पक्ष एकत्र असताना आणि चांगलं काम करत असताना त्यांना बळ देणं त्यांचं काम आहे. अशा वक्तव्यामुळं नाराजी होत असते,असे म्हणत त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली आहे.
राज्यात नव्याने उद्भवलेल्या करोना परिस्थितीबरोबरच राजकीय परिस्थितीवरही बैठकीत चर्चा केली जाणार आहे. संघटनात्मक कामकाजाचाही आढावा घेतला जाणार आहे.
राज्यात करोना साथरोगाचा पुन्हा पादुर्भाव वाढू लागला आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येणा?्या उपाययोजनांबाबत, पक्षाची भूमिका काय असावी, याबाबत बैठकीत चर्चा के ली जाणार असल्याचे समजते.
माजी मुख्यमंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टाळेबंदी करण्याची वेळ आलीच तर ज्यांचा रोजगार बुडेल त्यांना राज्य सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी के ली आहे. त्या अनुषंगानेही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
या बैठकीत मंत्र्यांच्या कामाची झाडाझडतीही घेतली जाणार आहे. मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गेल्या वर्षभरापासून कॉँग्रेसच्या मंत्र्यांनी पक्षाचे कामच केलेले नाही. त्याचबरोबर आपल्या मंत्रीपदाच्या ताकदीचा फायदा कार्यकर्त्यांना दिलेला नाही. त्यामुळे मंत्र्यांच्या कामावरही चर्चा होणार आहे.
UPA presidency and Sanjay Raut’s lead will be discussed in Congress meeting!