पाकिस्तानात कोरोनाचा उद्रेक, अनेक प्रांतात पूर्ण लॉकडाऊन, बंदोबस्तासाठी लष्कर तैनात


पाकिस्तानातील अनेक प्रांत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे ऐन ईद-उल-फत्रच्या काळात अनेक प्रांतात लॉकडाऊनची घोषा करण्यात आली आहे. त्यासाठी लष्करालाही तैनात करण्यात येणार आहे.Corona outbreak in Pakistan, complete lockdown in several provinces, troops deployed for security


विशेष प्रतिनिधी

लाहोर : पाकिस्तानातील अनेक प्रांत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे ऐन ईद-उल-फित्रच्या काळात अनेक प्रांतात लॉकडाऊनची घोषा करण्यात आली आहे. त्यासाठी लष्करालाही तैनात करण्यात येणार आहे.

पंजाबच्या अनेक प्रांतांमध्ये ८ ते १५ मेदरम्यान पूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. ईद-उल-फित्रच्या या काळात पंजाब, सिंध, खैबर पख्तूनख्वा व पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये प्रशासनाने लॉकडाऊनची घोषणा केली.पाकिस्तानात कोरोना संक्रमण वाढत आहे. पंजाबच्या आरोग्यमंत्री यास्मिन राशीद यांनी दिलेल माहितीनुसार, आठ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात दुकाने, शॉपिंग मॉल व बाजार बंद राहतील.

लोकांच्या येण्या-जाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस, रेंजर्स व लष्कराचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत औषधी, कोरोना व्हायरस लसीकरण, पेट्रोल पंप, किराणाची छोटी दुकाने, डेअरी, भाज्या, फळे आदी दुकाने सुरूराहतील.

खैबर पख्तूनख्वा, सिंध व पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरच्या प्रशासनांनीही अशाच प्रकारचे आदेश काढले आहेत.पाकिस्तानात आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे १८,५३७ जणांचा मृत्यू झाला आहे व एकूण संक्रमितांची संख्या ८,४५,८३३ वर गेली आहे.

Corona outbreak in Pakistan, complete lockdown in several provinces, troops deployed for security

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात