विशेष प्रतिनिधी
मुंबई: अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी हजारो भाविक चौपाटी परिसरात दाखल झाले आहेत. Devendra Fadnavis
गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे गिरगाव चौपाटीवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील विसर्जन मिरवणुका अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असल्याचे सांगितले. दहा दिवस भक्तिभावाने गणरायाची पूजा केल्यानंतर विसर्जनाचा दिवस हा आनंद आणि भावुकतेचा संगम असल्याचे त्यांनी म्हटले.
‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप
राजकीय विरोधकांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, “विरोधकांना बाप्पाने सुबुद्धी द्यावी आणि कुबुद्धीचे विसर्जन व्हावे,” अशी आपण गणरायाकडे प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. अनंत चतुर्दशीच्या विसर्जनासाठी मुंबईत २४ हजारांहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. रॅपिड अॅक्शन फोर्स, एसआरपीएफ, फोर्स वन, क्विक रिस्पॉन्स टीम आणि अँटी-ड्रोन पथकांसह विशेष यंत्रणाही महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे.
महापालिकेचेही २५ हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी विसर्जन व्यवस्थेसाठी कार्यरत आहेत. मुंबईत ६७ नैसर्गिक विसर्जन स्थळांसह ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. बीएमसीच्या माहितीनुसार, दीड दिवस, पाच दिवस, सहा दिवस आणि सात दिवसांच्या गणेशोत्सव कालावधीत आतापर्यंत मुंबईत १ लाख ६३ हजार ३८६ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले आहे.
विसर्जन स्थळांवर १,१३२ जीवरक्षक, ६,०५२ फ्लडलाईट आणि सर्चलाईट, ८५ रुग्णवाहिका आणि १० मोटरबोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. गर्दी नियंत्रणासाठी स्वागत केंद्रे, नियंत्रण कक्ष आणि टेहळणी मनोऱ्यांचीही व्यवस्था करण्यात आली होती.
गिरगाव चौपाटीसह मुंबईतील प्रमुख समुद्रकिनारे आणि विसर्जन स्थळांवर गणपती बाप्पाच्या जयघोषात भाविक आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App