पोलिसांनी सोशल मीडियावर काय करावे व काय करू नये यासाठी केंद्राचे नवे धोरण, युजर्सशी वाद टाळण्याचा सल्ला

central government prepared new social media policy for police force, Says give importance to criticism

new social media policy for police force : केंद्र सरकारने देशाच्या पोलीस दलासाठी सोशल मीडिया धोरण तयार केले आहे. या धोरणात पोलीस दलात काम करणार्‍यांनी टीका आणि कौतुकास समान महत्त्व देण्यास सांगितले गेले आहे. यासह सोशल मीडियाचा वापर करताना अवांछित तथ्य आणि भडकाऊ किंवा दिशाभूल करणार्‍या अफवा पसरवू नका, असेही सांगितले गेले आहे. central government prepared new social media policy for police force, Says give importance to criticism


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशाच्या पोलीस दलासाठी सोशल मीडिया धोरण तयार केले आहे. या धोरणात पोलीस दलात काम करणार्‍यांनी टीका आणि कौतुकास समान महत्त्व देण्यास सांगितले गेले आहे. यासह सोशल मीडियाचा वापर करताना अवांछित तथ्य आणि भडकाऊ किंवा दिशाभूल करणार्‍या अफवा पसरवू नका, असेही सांगितले गेले आहे.

गृह मंत्रालयाच्या पोलीस थिंक-टँक, ब्यूरो ऑफि पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (बीपीआरडी) यांनी तयार केलेले धोरण गेल्या महिन्यात सर्व राज्यांना शेअर करण्यात आले आहे. हे धोरण पोलीस अधिकाऱ्यांना सोशल मीडिया वापरण्यास प्रोत्साहित करते. अधिकाऱ्यांना जा त जास्त लोकांपर्यंत पोहोचून विभागाच्या कामांची माहिती देण्यास सांगितले आहे, परंतु कोणताही ‘राजकीय उपक्रम किंवा खासगी व्यवसाय’ करण्याबाबत त्यांना सतर्क केले गेले आहे.

या धोरणानुसार ‘कामाच्या तासांमध्ये किंवा एजन्सी उपकरणे वापरताना पोलीस अधिकाऱ्यांची ऑनलाइन क्रिया प्रामुख्याने कामाशी संबंधित असावी.

वैयक्तिक सोशल खात्यावर व्यक्त होण्यासाठी स्वातंत्र्य

राज्य आणि मध्यवर्ती पोलीस दलांसाठी “सोशल मीडिया पॉलिसी फॉर पोलिस ऑर्गनायझेशन” मध्ये काय करावे आणि काय करू नये याबद्दल एक मोठे दस्तऐवज आहे. 2005 पासून सैन्याचे स्वतःचे सोशल मीडिया धोरण अस्तित्वात आहे.

पोलिस कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंट्सवर बीपीआरडी धोरणात असे म्हटले आहे की, “सोशल मीडिया साइटवर नागरिक म्हणून वैयक्तिक विचार व्यक्त करण्यास विभागातील कर्मचारी स्वतंत्र असतात. त्यांच्या टिप्पणीमुळे विभागातील कार्यरत संबंधांवर परिणाम होऊ नये, ज्यासाठी निष्ठा आणि गोपनीयता महत्त्वाची आहे. त्यात सहकाऱ्यांमधील शिस्त आणि सद्भावनांचा बिघडणे, अथवा विभागाची सार्वजनिक प्रतिमा नकारात्मक नाही झाली पाहिजे. यात असे नमूद केले आहे की, पोलीस कर्मचार्‍यांनी कोर्टाची कार्यवाही, दोषारोप, हानिकारक, अश्लील, वांशिक, आक्षेपार्ह, बेकायदेशीर आणि बदनामी करणारे संदेश पोस्ट करू नये

सोशल मीडियावर युजर्सशी वाद टाळा

धोरणात असे म्हटले आहे की, पोलीस अधिकारी फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम किंवा इतर खाती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात, त्यांनी सोशल मीडिया युजर्सशी वाद घालू नये. याशिवाय वापरकर्त्याकडून नकारात्मक पोस्टला उत्तर देताना पोलिसांनी वस्तुस्थितीची माहिती दिली पाहिजे. बर्‍याच तज्ज्ञांनी या धोरणाचे स्वागत केले आहे.

central government prepared new social media policy for police force, Says give importance to criticism

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात