औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना चोपा; अभिनेता रितेश देशमुख याचे ट्विट


वृत्तसंस्था

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर सुरु असताना अनेकजण औषधांचा काळाबाजार करत आहेत. त्यांना भर रस्त्यात चोपले पाहिजे, असे ट्विट अभिनेता रितेश देशमुख याने केले आहे. Persons who are Involved In The Back Market of Medicines, Should be beaten on Steeret : Ritesh Dshmukh

राज्यात अनेकांना ऑक्सिजन आणि बेड्स मिळतं नाहीत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असून त्याचा काळाबाजार सुरु आहे. त्यावर रितेश देशमुखने संताप व्यक्त केला.‘औषधांचा काळाबाजार करणार्‍यांना भर रस्त्यात चोपल पाहिजे’, असे ट्वीट त्याने केले आहे.
नागपूरमध्ये कोरोना रुग्णाला रेमडेसिवीर हे इंजेक्शन देण्याऐवजी अॅसिडिटीचे इंजेक्शन दिले होते. अशा अनेक घटना घडत आहेत. कोरोनाच्या संकटात वैद्यकीय क्षेत्रातील काळाबाजार पाहून रितेशला भावना आवरता आल्या नाहीत. त्यातून त्याने हे ट्विट केले.

दरम्यान, रितेशसह बॉलिवूड कलाकारांनी औषधांच्या काळाबाजारावर संताप व्यक्त केला. अभिनेत्री रवीना टंडनने 300 ऑक्सिजन सिलेंडर्स पाठवून काळाबाजारावर संताप व्यक्त केला.

Persons who are Involved In The Back Market of Medicines, Should be beaten on Steeret : Ritesh Dshmukh

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण