Viral Video – कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर्सवर हल्ल्याची एक घटना अहमदनगरच्या संगमनेरमधून समोर आली आहे. गर्दी करण्यावरून आणि कोरोनाचे नियम न पाळण्यावरून पोलिस नागरिकांना सूचना करत होते. पण त्याचवेळी जमावाने पोलिसांनाच मारहाण आणि दगडफेक केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेमुळे काही काळासाठी शहरात तणावाचं वातावरण होतं. जमावाने पोलिसांवर दगडफेकही केली. तसंच सार्वजनिक ठिकाणी तोडफोड केल्याचंही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करून तो जाताना त्याचा पाठलागही जमावानं केला आहे. कोरोना काळात आपल्या सर्वांसाठी 24 तास रस्त्यावर असलेल्या पोलिसांवर अशा प्रकारे हल्ला झाल्यानं, सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे.
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App