WATCH : सोशल मीडियावर व्हायरल झाले संस्कारी कुत्रे… पाहा VIDEO

Viral Video संध्याकाळची वेळ झाली की घरात शुभंकरोती ऐकू येणार… जेवणासाठी बसलो की जेवण करण्यापूर्वी कुटुंबातील सगळे एकसुरात वदनी कवळ म्हणणार हे चित्र आजच्या काळात घरांमध्ये अपवादानंच पाहायला मिळतं. मुलांना चांगले संस्कार लावण्यासाठी कुटुंबातील ज्येष्ठ अशा गोष्टी मुलांना शिकवायचे. पण आता छोट्या कुटुंबांमध्ये मुलांना आजी आजोबांचं प्रेम मिळणंच कठीण झालं आहे तर मग असे संस्कार कसे मिळणार. मात्र असं असलं तरी काही कुटुंबांमध्ये मात्र आजही या सर्व परंपरा पाळल्या जात आहेत. पण जर कुटुंबाचेच सदस्य असलेल्या पाळीव कुत्र्यांनाही असे संस्कार दिले जाऊ शकतात असं म्हटलं तर कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही बरोबर ना. मग हा व्हिडिओ पाहा. Viral video of dogs waiting for prayer before eating food

हेही वाचा –